नवी मुंबई : शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशीच भाजपला नवी मुंबईत झटका दिलाय. यादवनगर विभागावर मजबूत पकड असणारे भाजपचे नगरसेवक राम आशिष यादव यांनी आमदार गणेश नाईक यांना रामराम ठोकून हाती शिवधनुष्य उचललंय. नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. नवी मुंबईत भाजपतून जोरदार आऊट गोईंग सुरु आहे. त्यामुळे भाजपचा गड दिवसेंदिवस ढासळत चालल्याच्या चर्चेला उधाण आलंय (BJP Corporator Ram Yadav join Shivsena in Navi Mumbai).
यादव नगर एमआयडीसी परिसरात राम आशिष यादव गेली 30 वर्षे सामाजिक आणि राजकीय काम करत आहेत. त्यांनी मागील 10 वर्षे महापालिकेत या भागाचे प्रतिनिधीत्व केलेय. मागील वर्षी गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यावर यादव यांनीही नाईकांना समर्थन देऊन भाजपात प्रवेश केला होता. सध्या नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्याने पक्षांतराचे जोरदार वारे वाहू लागले आहे. यामध्ये भाजपला गळती लागली आहे. शिवसेनेत इनकमिंग सुरु आहे. कट्टर समर्थक साथ सोडू लागल्याने नवी मुंबईतील भाजपला जोरदार हादरा बसलाय.
मागील आठवड्यात महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढता येऊ नये म्हणून राजकीय आकसापोटी आपल्यावर कारवाई होऊ शकते, असा आरोप यादव यांनी केला होता. तसेच पक्षांतरासाठी दबाव येत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. आपल्याला होणारा त्रास एवढा वाढला आहे की आपल्यावर हल्ला देखील होऊ शकतो अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती.
पोलीस प्रशासनाने आपल्या जीविताचे रक्षण करण्यासाठी संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. या सगळ्या प्रकरणानंतर आता राम आशिष यादव यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे या पक्षप्रवेशाविषयी उलटसुलट चर्चा सुरु आहे.
हेही वाचा :
नवी मुंबईत राजकीय वातावरण तापलं, आरोग्य सेवेच्या उद्घाटनासाठी गणेश नाईकांना एनवेळी आमंत्रण
नवी मुंबईत महाविकास आघाडीचे नेते एकत्र; गणेश नाईकांच्या सत्तेला हादरा बसणार?
आशिष शेलार नवी मुंबई दौऱ्यावर, मंदा म्हात्रेंशी भेट, नाईकांसोबत मतभेद मिटवण्याचे प्रयत्न?
व्हिडीओ पाहा :
BJP Corporator Ram Yadav join Shivsena in Navi Mumbai