तुकाराम मुंढेंकडून 108 नगरसेवकांना भेटण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ, बसायला खुर्चीही नाही, भाजप नगरसेवक नाराज
नागपूर शहरातील मंजूर पण काम सुरु विकास कामांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थगिती दिली (IAS Tukaram Mundhe meet bjp corporator) आहे.
नागपूर : नागपूर शहरातील मंजूर पण काम सुरु विकास कामांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थगिती दिली (IAS Tukaram Mundhe meet bjp corporator) आहे. त्यामुळे संतापलेल्या भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. पण 108 नगरसेवकांना भेटण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी फक्त 15 मिनिटांची वेळ दिली. त्यातही काहींना उभं राहावं लागलं. यावर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजप नगरसेवकांच्या पहिल्या वहिल्या भेटीत अनोख्या प्रकारचं हे चित्र पाहायला मिळालं. भाजपच्या 108 नगरसेवकांच्या भेटीसाठी अवघे 15 मिनिटं वेळ का दिला? नगरसेवक आत येताना सुरक्षा रक्षकांनी का तपासलं? नगरसेवकांना बसायला खुर्च्या का नाही? या प्रश्नांनी आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजप नगरसेवकांच्या पहिल्या भेटीची सुरुवात झाली. वातावरण तापल्यामुळे भेटीच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले, पण आम्ही गुंडे आहोत का? असा सवाल करत नगरसेवकांनी पोलिसांना बाहेर जायला लावलं.
नागपूर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळेच आर्थिक कारण देत, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात मंजूर झालेले पण सुरु न झालेल्या विकास कामांना स्थगिती दिली. यामुळे संतापलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. पण भेटीतून समाधान झालं नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नगरसेवकांनी दिली.
नगरसेवक जनतेचे प्रतिनिधी आहे. या जनप्रतिनिधींना उभं ठेवणे, हा जनतेचा अपमान आहे. अशा भावना अनेक नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. पण या निमित्ताने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबाबत नागपुरात सर्वपक्षीय नगरसेवकांची नाराजी मात्र वाढताना दिसतं (IAS Tukaram Mundhe meet bjp corporator) आहे.