मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं ट्विटर प्रोफाईल बदललं आहे. ‘महाराष्ट्र सेवक’ असं त्यांनी आपल्या प्रोफाईलमध्ये बदल केला आहे. काल राज्याच्या राजकारणाने अनपेक्षित वळण घेतलं. एकीकडे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसतील असं वाटत असतानाच त्यांनी स्वत:च एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्याचे मुख्यमंत्री असतील असं जाहीर केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ते सत्तेत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं. फडणवीसांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचं सांगितलं जात होतं. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (jp nadda) यांनी एक ट्विट करून फडणवीसांना सत्तेत सहभागी होण्याचे आदेश दिला. पंतप्रधानांनी दोनदा फोन केला. अमित शहा यांनीही ट्विट केलं. त्यामुळे फडणवीसांचा जो मास्टर स्ट्रोक होता, तो त्यांच्यावरच उलटल्याचं स्पष्ट झालं. नड्डा, मोदी आणि शहा यांचाच हा मास्टरस्ट्रोक असल्याचं दिसून आलं. अवघ्या तीन तासातच संपूर्ण खेळी उलटली. फडणवीसांना अनिच्छेने मंत्रिमंडळात जावं लागलं आणि दुय्यम खात्यावर समाधान मानावं लागल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या प्रोफाईलमध्ये बदल केला.
देवेंद्र फडणवीस यांनी आपलं ट्विटर प्रोफाईल बदललं आहे. ‘महाराष्ट्र सेवक’ असं त्यांनी आपल्या प्रोफाईलमध्ये बदल केला आहे.
ठाकरे सरकारने कांजूर मार्गला ज्या जागेची मेट्रो कारशेडसाठी निवड केली होती. तेव्हाही या जागेवरून बराच वाद पेटला होता. ही जागा केंद्रची की राज्याची यावरून बराच राजकीय वादंग रंगला होता. राज्य सरकारकडून या जागेवर मालकीचा दावा करण्यात आला नव्हता. तर ही जागा ही केंद्र सरकारचीच असल्याचा दावा ही केंद्राकडून करण्यात आला. त्यामुळे आता फडणवीस सत्तेच येताना मेट्रोचं कारशेड हे आरेत नेण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे.
मेट्रोचं कारशेड हे आरेत नेणं ही पर्यावरणाची हानी आहे. त्यामुळे या जागेवर कारशेड बांधू नये असे म्हणत शिवसेना ही पहिल्यापासून या निर्णयाला विरोध करत आहे. या वादात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचीही भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे. तर या ठिकाणी झाडं तोडण्यास परवागी घेण्यापासूनचं प्रकरण हे कोर्टापर्यंत पोहोचला आहे. तसेच पर्यावरणप्रेमींनीही या निर्णयाला कडाकडून विरोध केला आहे. त्यामुळे आता पुन्हा कारशेड हे आरेत गेल्यास हा वाद पुन्हा भडकण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसातच हेही चित्र स्पष्ट होईल.