मुंबई : ‘सामना’इतका अंतर्विरोध कुठेच पाहिला नाही. ‘सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवार साहेबांच्या विरोधात असते, तर कधी बाजूने. त्यांना स्वतःचा बेसच नाही, अशी बोचरी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (Devendra Fadnavis on Saamana)
‘सामना’ची भूमिका रोज बदलते, ती कधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात असते, कधी बाजूने असते. कधी राज्यपालांच्या बाजूने असते, तर कधी विरोधात असते. त्यांना स्वतःचा बेसच नाही. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या ‘सामना’ची काय अवस्था आहे. भूमिका नसलेला सामना, लांगुलचालन करणारा सामना, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“त्यांना काय करायचे ते लख लाभ, आम्ही आमचं काम करत राहू. आम्हाला सरकार पाडायची घाई नाही. आम्ही तसा प्रयत्नही करणार नाही. त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी पाच वर्ष सरकार चालवावे” असे फडणवीस ‘टीव्ही9 मराठी’शी बातचीत करताना म्हणाले.
हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
हा कुणाच्याही विरोधातला दौरा नाही. सरकारला मदत करणारा दौरा आहे. यंत्रणांमध्ये समनव्य नाही. आमचा सर्व फोकस कोरोनावर आहे. पण चोराच्या मनात चांदणं असतं, तशी अवस्था या सरकारची आहे. त्यामुळे रोज या सरकारला सांगावं लागतं, की हे सरकार पडणार नाही. त्यांच्यातील अंतर्विरोधामुळे समाज मनात हे सरकार एकरुप नसल्याचे चित्र आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“परीक्षांबाबत राजकीय इगो नको”
अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा राजकीय इगो करु नये. इतर राज्य जर परीक्षा घेत असतील, तर आपल्या विद्यार्थ्यांचं काय होईल? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. सरकार आपली जबाबदारी सातत्याने टाळत आहे. मूल्यमापन करण्याचे एक सूत्रही हे सरकार ठरवू शकले नाही. पोरखेळ करु नये, विचारपूर्वक निर्णय करावा, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.
हेही वाचा : फडणवीसांना कोरोनाची भीती नाही, मुख्यमंत्री घरीच का? आम्हाला ‘मातोश्री’वरही परवानगी नाही : चंद्रकांत पाटील
“बदल्यासंदर्भात नामुष्की”
पोलीस उपायुक्तांच्या बदल्यासंदर्भात अशी नामुष्कीची अवस्था आधी कधीच आली नव्हती.
आधी मुख्यमंत्र्यांना डावलण्यात आलं आणि आता मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून दिली, असा टोला लगावत समनव्याने प्रशासन चालवायला हवं, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला.
पाहा व्हिडिओ :
(Devendra Fadnavis on Saamana)