सत्ता भाजपचीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, संजय काकडे यांची भविष्यवाणी
"राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील," अशी भविष्यवाणी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी (Sanjay Kakade On Bjp government formation) केली आहे.
पुणे : “राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील,” अशी भविष्यवाणी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी (Sanjay Kakade On Bjp government formation) केली आहे. संजय काकडे यांनी याआधी अनेकदा अशाप्रकराच्या भविष्यवाणी केल्या (Sanjay Kakade On Bjp government formation) आहेत. यापूर्वीही काकडेंनी पुणे आणि बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दहा जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येतील. असा अंदाज वर्तवला (Sanjay Kakade On Bjp government formation) होता.
“भाजपच सत्तास्थापन करणार, तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. मी याबाबत कोणताही अंदाज बांधत नाही. मात्र राज्यात जी वस्तूस्थिती आहे, तसेच वरिष्ठ पातळीवर ज्या चर्चा होतात. त्यावरुन मी तुम्हाला हे सांगत आहे,” असे संजय काकडे यांनी सांगितलं.
पुण्यात महापौरपदासाठी अर्ज भरण्याच्या वेळेस पत्रकारांनी काकडेंना राज्यातील राजकीय घडामोडींबाबत विचारले होते. त्यावेळी त्यांनी “राज्यात याआधी दोन प्रादेशिक पक्ष कधीही एकत्र सत्तेत आलेले नाही. त्यामुळे कोणी काहीही केलं तरी राज्यात भाजपचीच सत्ता येईल. तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील,” अशी भविष्यवाणी केली (Sanjay Kakade On Bjp government formation).
पुण्यासह राज्यातील 27 महापालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 13 नोव्हेंबरला मुंबईत काढण्यात आली. त्यात पुणे महापालिकेचे महापौरपदासाठी खुल्या सर्वसाधारण वर्गाचं आरक्षण निघालं. त्यामुळे सत्ताधारी भाजपमधून महापौरपदासाठी कुणाला संधी मिळणार याची जोरदार चर्चा होती. पालिकेत भाजपची तब्बल 99 नगरसेवकांसह एकहाती सत्ता आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही मोठी आहे. मात्र, या पदावर भाजपकडून अनुभवी नगरसेवकालाच संधी मिळणार असल्याचे बोललं जात होतं.
पुणे महापालिकेचे महापौरपद (Next mayor of PMC) पुढील अडीच वर्षांसाठी खुल्या सर्वसाधारण वर्गासाठी असणार आहे. त्यामुळे महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये मोठी चढाओढ दिसून येत आहे. 22 नोव्हेंबरला महापौरपदासह उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यावेळी महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार (Next mayor of PMC) हे पाहावे लागणार आहे.