एका वर्षात भाजपचा पक्षनिधी काँग्रेसपेक्षा 16 पटीने जास्त
दिल्ली : एका वर्षात भाजपला 400 कोटींपेक्षा जास्त पक्षनिधी मिळाला आहे. भाजपने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या काँट्रीब्यूशन रिपोर्टनुसार 2017-18 या एका वर्षात भाजपला 400 कोटी रूपयांहून अधिक पक्षनिधी मिळाला आहे. तर काँग्रेसला केवळ 26 कोटी रूपये पक्षनिधी मिळाला. भाजपचा पक्षनिधी हा काँग्रेसपेक्षा 16 पट्टींनी जास्त आहे. ईकॉनॉमिक टाईम्सच्या राजकीय पक्षांच्या योगदान अहवालांच्या आढाव्याद्वारे हे उघड झाले. दोन्ही राजकीय पक्षांच्या या वार्षीक ऑडिट अकाउंट्समध्ये […]
दिल्ली : एका वर्षात भाजपला 400 कोटींपेक्षा जास्त पक्षनिधी मिळाला आहे. भाजपने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या काँट्रीब्यूशन रिपोर्टनुसार 2017-18 या एका वर्षात भाजपला 400 कोटी रूपयांहून अधिक पक्षनिधी मिळाला आहे. तर काँग्रेसला केवळ 26 कोटी रूपये पक्षनिधी मिळाला. भाजपचा पक्षनिधी हा काँग्रेसपेक्षा 16 पट्टींनी जास्त आहे. ईकॉनॉमिक टाईम्सच्या राजकीय पक्षांच्या योगदान अहवालांच्या आढाव्याद्वारे हे उघड झाले. दोन्ही राजकीय पक्षांच्या या वार्षीक ऑडिट अकाउंट्समध्ये आणखी वाढ होऊ शकते. पूर्ण ऑडिटेड रिपोर्ट येईपर्यंत भाजपचा पक्षनिधी 1,000 कोटी रूपयांपर्यंत पोहोचू शकतो.
भाजप आणि काँग्रेसने आतापर्यंत 2017-18चं वार्षिक ऑडिट इन्कम टॅक्स रिटर्न आणि बँलेंसशीट अद्याप फाईल केलेली नाही.
दोन्ही राजकीय पक्षांनी अद्याप निवडणूक निधी जाहीर केलेला नाही. काँग्रेस आणि भाजपच्या वार्षीक ऑडिटेड अकाउंट्समध्ये याची माहिती दिली जाऊ शकते. याद्वारे भाजपला आणखी पक्षनिधी मिळू शकतो. भाजपला प्रूडेंट ईलेक्ट्रोरल ट्रस्टकडून 144 कोटींहून अधिक निधी मिळाला आहे. तर काँग्रेसला एक कोटी देणाऱ्या आदित्य बिर्ला जनरल ईलेक्ट्रोरल ट्रस्टने भाजपला 12 कोटींहून अधिकचा निधी दिला. मुरुगप्पा ग्रुपच्या ट्रांयफ ईलेक्टोरल ट्रस्टने भापज आणि काँग्रेसला प्रत्येकी एक कोटी रूपये दिले.
या शिवाय कॅडिला हेल्थकेयर 13 कोटीहून अधिक निधी भाजपला दिला. माइक्रो लॅब्स प्राइव्हेट लिमिटेड आणि यूएसवी प्राइवेट लिमिटेडने भापज आणि काँग्रेसला प्रत्येकी नऊ कोटी रूपये दिले. सिप्लाने भापजला नऊ कोटी रूपये तर एलेंबिक फार्मास्युटिकल्स आणि महावीर मेडिकेटने सहा कोटी रूपये दिले. लोढाने 6.5 कोटी, जे कुमार ईन्फ्रास्ट्रक्चर प्रॉजेक्ट्सने पाच कोटी, तर रेअर इंटरप्राइजेसने नऊ कोटी रूपये भाजपला फंड स्वरूपात दिले.
2014मध्ये जेव्हा भाजप सत्तेवर आली, तेव्हापासून पक्षाच्या योगदान निधीत 53 टक्कयांची वाढ झाली आहे. 2013-14 साली पक्षांचा फंड हा 673.81 कोटी रूपये होता, जो 2016-2017 साली 1,034.27 कोटी पर्यंत वाढला होता. याच दरम्यान काँग्रेसचा निधी 598.06 कोटींहून घसरून 225.36 कोटींवर येऊन ठेपला. राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप आणि इतर पक्षांच्या पक्षनिधीमध्ये खूप मोठी तफावत आहे.