“खडसेंची अवस्था म्हणजे मंदिराच्या बाहेर गेले अन् चप्पलच चोरीला गेली अशी”, गिरीश महाजनांनी डिवचले
खडसेंची अवस्था म्हणजे मंदिराच्या बाहेर गेले अन् चप्पलच चोरीला गेली अशी -गिरीश महाजन
जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे नेते तसंच नवनिर्वाचित विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसेंची अवस्था म्हणजे मंदिराच्या बाहेर गेले अन् चप्पलच चोरीला गेली अशी झाली आहे, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. “खरंतर खडसेंना असं वाटत होतं आपण मंत्री होऊ पण सर्व गोष्टी मनासारख्या होत नाहीत. खडसेंनी विधान परिषदेत शपथ घेतली. ते महाविकास आघाडीचा भाग झाले. पण खडसे महाविकास आघाडीत आले आणि उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता गेली.त्यामुळे खडसेंना आता -आमदारकीवरच समाधान मानावे लागेल. पंगत बसली आणि बुंदी संपली. सोशल मीडियावर ऐकलं त्याहीपेक्षा मी असा ऐकलं मंदिरात गेले आणि प्रसाद संपला. मंदिराच्या बाहेर आले तोवर चप्पलच चोरीला गेली,अशी अवस्था खडसेंची झाली आहे”, असं गिरीश महाजन म्हणालेत.
महाजनांची खडसेंवर टीका
“खरंतर खडसेंना असं वाटत होतं आपण मंत्री होऊ पण सर्व गोष्टी मनासारख्या होत नाहीत. खडसेंनी विधान परिषदेत शपथ घेतली. ते महाविकास आघाडीचा भाग झाले. पण खडसे महाविकास आघाडीत आले आणि उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता गेली.त्यामुळे खडसेंना आता -आमदारकीवरच समाधान मानावे लागेल. पंगत बसली आणि बुंदी संपली. सोशल मीडियावर ऐकलं त्याहीपेक्षा मी असा ऐकलं मंदिरात गेले आणि प्रसाद संपला. मंदिराच्या बाहेर आले तोवर चप्पलच चोरीला गेली,अशी अवस्था खडसेंची झाली आहे. सोशल मीडियावर अनेक गमती घडतात मात्र खडसेंबाबत योगायोग म्हणावा लागेल”, असं गिरीश महाजन म्हणालेत.
खडसेंना शुभेच्छा
एकनाथ खडसे यांनी नुकतंच विधान परिषदे शपथ घेतली. त्यांना माझ्या शुभेच्छा, असं महाजन म्हणालेत.
गिरीश महाजन काय म्हणाले?
गिरीश महाजन यांचा खुलासा मी गुवाहाटीला वगैरे गेलो नाही. मी मुंबईतच होतो. आता आमचं सरकार सत्तेत आलंय. अडीच वर्षात कुठलाही विकास या महाविकास आघाडी सरकारकडून झाला नाही. त्याउलट अडीच वर्षात मोठ मोठे घोटाळे भ्रष्टाचार वाढले. महाविकास आघाडीने राज्याला दहा वर्षे मागील मी नेलं. आता राज्याच्या विकासाला गती आता द्यायची गरज आहे. अडीच वर्षात विजेचा एकही प्रश्न या सरकारने मांडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कंबर न मोडले आहे, असं ही महाजन म्हणालेत.