भाजप सरकार पब्लिसिटीत हिरो, गुलाम नबी आझादांनी दिलं सर्टिफिकेट, तर देवेंद्र फडणवीसांची आजही मदत घेतो, नितीन राऊतांचं गुपित!
अमेरिका अर्थव्यवस्थेत पुढे असली तरी वैद्यकीय क्षेत्रात आपला भारत देश पुढे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अमेरिका आणि इंग्लंडपेक्षाही भारतीय डॉक्टर अनुभवी आहेत, असेही ते म्हणाले. हे तिनही नेते आज नागपूरमध्ये लोकमतच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
नागपूर : केंद्रातील नरेंद्र मोदीचं भाजपा सरकार (BJP Government) हे पब्लिसिटीत हिरो आहेत, असे प्रशस्तीपत्रक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जी-२३ गटातील नेते गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी दिले आहे. नागपुरात एका कार्यक्रमात काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकाच व्यासपीठावर होते. यावेळी गुलाम नबी आझाद यांनी कोरोना काळाच्या संदर्भात बोलत होते. आरोग्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात आपणही चांगले काम केले असे सांगताना फडणवीसांकडे बघत यांचे सरकार पब्लिसिटीत हिरो असल्याचे त्यांनी मान्य केले. ही टीका नसल्याचे नमूद करत, आपण, यूपीए सरकार आणि काँग्रेस पक्ष केलेल्या कामाची पब्लिसिटी करण्यात कमी पडल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अमेरिका अर्थव्यवस्थेत पुढे असली तरी वैद्यकीय क्षेत्रात आपला भारत देश पुढे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अमेरिका आणि इंग्लंडपेक्षाही भारतीय डॉक्टर अनुभवी आहेत, असेही ते म्हणाले. हे तिनही नेते आज नागपूरमध्ये लोकमतच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
नितीन राऊतांनी सांगितले गुपित
तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेल्या अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, फडणवीस आणि आपण एकत्रच आमदार झालो होतो, असे सांगत राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी नागपूरच्या राजकारणात खेळीमेळीचं वातावरण असल्याचे स्पष्ट केले. कोरोना काळात नागपुरातील सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन काम केले, यासाठी राऊत यांनी गडकरी आणि फडणवीसांचे आभारही व्यक्त केले. आपले आजोळ धरमपेठ असल्याचे सांगत देवेंद्रजींचे वडील गंगाधरपंतांशी असलेल्या कौटुंबिक संबंधांचाही त्यांनी उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस यांची आजही मदत घेतो, असेही नितीन राऊत यांनी सांगितले. विधानसभेत आजही आपल्या पक्षाला म्हणजेच काँग्रेसला काही गोष्टी आवडत नसतील तर देवेंद्र फडणवीस यांची मदत घेतो, असे राऊतांनी सांगितले. अर्थ खात्याच्या काही अडचणी असतील किंवा चिमटे काढायचे असतील तर देवेंद्र फडणवीस यांना गुपचुप चिट्ठी पाठवून सांगतो, असेही त्यांनी मिश्किलपणे
I am thankful to Lokmat Parivar & and Vijay Darda ji for giving me the ‘Excellence in Healthcare Award 2021’ in the category of ‘Outstanding service to society during Covid pandemic’ at the hands of Senior leader Ghulam Nabi Azad ji !@Lokmat #Covid #pandemic #SevaHiSanghatan pic.twitter.com/LdpNQT9lzU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 4, 2022
सांगितले.
समृद्धी महामार्गाला पाठिंबाच दिला – राऊत
विकासाच्या कामात राजकारण येऊ नये, असे मतही यावेळी नितीन राऊत यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने नागपुरात अनेक विकास कामे करु शकलो याची आठवणही राऊतांनी या कार्यक्रमात करुन दिली. फडणवीस मुख्यमंत्री असताना, त्यांच्या समृद्धी महामार्गाला काँग्रेसच्या नागपूरच्या नेत्यांनी नेहमीच पाठिंबा दिला, कुठल्याही पातळीवर विरोधी वक्तव्येही केली नाहीत, याची आठवणही त्यांनी या कार्यक्रमात करुन दिली. समृद्धी महामार्गाच्या उभारणीला नेमही मदतच केली, विरोध केला नाही, असे त्यांनी सांगितले.