सरकारकडे बहुमत नाही, विधानसभा बरखास्त करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

राज्यसरकारकडे बहुमत नाही असा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि लवकर निवडणुका घेण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

सरकारकडे बहुमत नाही, विधानसभा बरखास्त करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
haryana congressImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 7:39 PM

हरियाणा राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. राज्यातील भाजप सरकारकडे बहुमत नाही असा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे राज्यपाल यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा आणि उदय भान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन देऊन विधानसभा बरखास्त करण्याची मागणी केली. राज्यातील भाजप सरकारकडे बहुमत नाही, असे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने म्हटले.

हरियाणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. राज्यातील सत्तारूढ भाजप सरकारविरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. कॉंग्रेस नेते भूपिंदरसिंग हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी केली, ‘हरियाणा विधानसभा बरखास्त करा, लवकर निवडणुका घेण्याच्या सूचना द्या’, असे निवेदन काँग्रेसने राज्यपालांना सादर केले.

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदर हुडा यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की. राज्यातील घोडे व्यापार थांबवण्यासाठी आम्ही ही मागणी केली आहे. भाजप सरकार अल्पमतात आहे. सध्याच्या सभागृहाला 87 आमदारांच्या बहुमतासाठी 44 आमदारांची गरज आहे. मात्र, सरकारला 43 आमदारांचा पाठिंबा आहे. याआधी 11 मे रोजी काँग्रेसने हरियाणा सरकारची फ्लोअर टेस्ट घेण्यात यावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली होती. त्यामागे भाजपची घोडेबाजी हे मुख्य कारण होते. मात्र, आता आम्ही हरियाणा विधानसभा बरखास्त करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे असे ते म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे संख्याबळ नाही. परंतु, आणखी 16 आमदारांनी पाठिंबा दिल्यास आम्ही निवडणूक लढवू शकतो. मात्र या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची अधिक शक्यता आहे. शिवाय सरकारकडे बहुमत नाही. त्यामुळे पूर्वीची फ्लोर टेस्ट घेण्याच्या मागणीऐवजी आम्ही आता प्लॅन बदलला असून थेट विधानसभा बरखास्त करण्याची मागणी केली आहे असे त्यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.