BMC election 2022 Lokhandwala Complex Ward No 60 : 2017 मध्ये निसटता विजय भाजपचा झाला होता, यावेळी शिवसेना झेंडा फडकवणार?
मागच्या निवडणूकीत आपला पक्ष कसा मजबूत होईल हे पाहण्यासाठी प्रत्येक पक्षाने एकलाचला रे चा नारा दिला होता. त्यामुळे 2017 मध्ये सर्वच पक्ष स्वबळावर महापालिकेच्या निवडणुकीत उतरले होते. ज्यात शिवसेना, भाजप, काँग्रसे आणि राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष होते.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या (BMC election 2022) पार्श्वभूमीवर राज्यातील एकेकाळचे मित्र आज दुसऱ्याच्या समोर आले आहेत. तर भाजपकडून महापालिका निवडणुकेत भ्रष्टाचार होत असून ते थांबविण्यासाठी कमळाला साथ द्या अशी मतदारांना हाक दिली जात आहे. तर भाजपकडून चांगल्या कारभाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईच्या विकासाला खो घालण्याचे काम केले जात असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. तसेच यावेळी जनता शिवसेनेला संधी देईल असेही शिवसेनेकडून (Shiv Sena) विश्वास व्यक्त केला जात आहे. याचदरम्यान गेल्या निवडणूकीत भाजपचा निसटता विजय झाला होता. त्यावेळी भारतीय जनता पार्टीकडून योगीराज (निलेश) दाभाडकर (Yogiraj Dabhadkar from Bharatiya Janata Party) हे नगरसेवक म्हणून 6908 मते घेत निवडून आले होते. तर त्यावेळी शिवसेनेच्या यशोधर (शैलेश) पदमाकर फणसे यांना 6406 मते पडली होती. फणसे यांना जेमतेम 400 मतांनी हार पत्करावी लागली होती. त्यामुळे भाजपच्या योगीराज (निलेश) दाभाडकर यांनी शिवसेनेच्या यशोधर फणसेंसह अनेकांना मागे सोडत आपल्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ पाडून घेतली होती. मात्र यावेळी हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने फणसेंसह अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे येथे रस्सी खेच करण्यासाठी शिवसेनेसह भाजप आणि इतर पक्षांना अनुसूचित जातीचा उमेदवार शोधावा लागणार आहे.
2017 मध्ये काय घडलं?
मागच्या निवडणूकीत आपला पक्ष कसा मजबूत होईल हे पाहण्यासाठी प्रत्येक पक्षाने एकलाचला रे चा नारा दिला होता. त्यामुळे 2017 मध्ये सर्वच पक्ष स्वबळावर महापालिकेच्या निवडणुकीत उतरले होते. ज्यात शिवसेना, भाजप, काँग्रसे आणि राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष होते. त्यामुळे मतदारांनाही उमेदवार निवडताना कोणतीच अडचण आली नाही. तर गेल्या वेळी भाजपचे वारे असल्याने प्रभाग क्रमांक 60 मध्ये भाजपला विजय मिळवता आला होता.
पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष / इतर |
वार्ड क्र 060 के. पश्चिम प्रभाग सीमा
प्रभाग क्रमांक 60 मध्ये ‘के/पश्चिम’आणि ‘पी/दक्षिण’वॉर्डांच्या (बेस्ट कॉलनी रोड) आणि लोखंडवाला रोड, लोखंडवाला रोडच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे जाणारा आणि लिंक रोडच्या जंक्शनपर्यंत, लिंक रोडच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे के.एल. वालावलकर रोड पर्यंत; के.एल. वालावलकर रोडच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे पी. टंडन रोड पयंत; तेथून पी. टंडन रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे ‘ए’नाल्यापर्यंत; उक्त नाल्याच्या पश्चिम बाजूने व दक्षिण बाजूने पूर्वेकडे के.एल. वालावलकर रोड पर्यंत; ; तेथून के.एल. वालावलकर रोडच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे जयप्रकाश रोड पयंत; तेथून जयप्रकाश रोडच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे अच्युतराव पटवर्धन रोड पर्यंत; अच्युतराव पटवर्धन रोडच्या पूर्व बाजूने उत्तरेकडे पी. टंडन रोड आणि बॅक रोड जंक्शनपर्यंत; तेथून उक्त जंक्शनच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे बीएमसी रोडच्या जंक्शनपर्यंत; तेथून बीएमसी रोडच्या पूर्व बाजूने उत्तरेकडे ‘के/पश्चिम’आणि ‘पी/दक्षिण’ वॉर्डांच्या (बेस्ट कॉलनी रोड) सामायिक सीमारेषेपर्यंत; तेथून उक्त सामाईक सीमेच्या उत्तर बाजूने पूर्वेकडे लोखंडवाला रोडच्या जंक्शनपर्यंत
मतदार संघातून सार्वत्रिक निवडणूक 2017
योगीराज (निलेश) दाभाडकर (भारतीय जनता पार्टी) 6908
दिघे ज्योत्स्ना अभय (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस) 3489
यशोधर (शैलेश) पदमाकर फणसे (शिवसेना) 6406
विकास जगदीश जंगम (नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी) 98
सुरेश कनोजिया (युनायटेड कॉंग्रेस पार्टी) 120
मकवाना उमर मोहम्मद (अपक्ष) 44
सायरा पटेल (अपक्ष) 50
प्रशांत राणे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 539
एकूण 17644
एकूण मतदार 38148
एकूण वैध मते – 17644
एकूण अवैध मते 00
एकूण प्रदत्त मते 04