पटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून, वेगवेळल्या पक्षांनी प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपनेही प्रचारासाठी 30 जणांची यादी जाहीर केली असून यामध्ये स्टार प्रचारक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. (BJP has announced a list of 30 star campaigners for the Bihar Assembly elections)
केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री करणार प्रचार
भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार विद्यामान तसेच माजी मंत्री आणि मुख्यमंत्री बिहारमध्ये प्रचारासाठी उतरणार आहेत. यामध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मत्स्यपालन, पशुसंवर्धन मंत्री गिरिराज सिंह, माजी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह, कायदेमंत्री रविशंकर प्रसाद, महिला आणि बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास हे देखील बिहारमध्ये प्रचार करणार आहेत.
BJP releases a list of 30 star campaigners for upcoming #BiharElections2020
PM Modi, Home Minister Amit Shah, Defence Minister Rajnath Singh, party president JP Nadda, Union Minister Smriti Irani, UP CM Yogi Adityanath, Devendra Fadnavis and other leaders included in the list. pic.twitter.com/iKfGicyFLt
— ANI (@ANI) October 11, 2020
काँग्रेसकडून सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी मैदानात
काँग्रेस पक्षानेदेखील आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यावर बिहार निवडणुकीत प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसही बिहार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. तशी माहिती खासदार प्रफुल्ल पटेलांनी दिली आहे. निवडणूक लढण्यासाठी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर उमेदवार आहेत, असंही पटेल म्हणाले होते. बिहार राज्यात येत्या 28 ऑक्टोबरपासून तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. तसेच निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे.
शिवसेना 50 जागांवर लढणार
शिवसेनेने बिहार निवडणुकीत 50 जागांवर लढणार आहे. पक्षाकडून 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान, कोरोनाच्या संसर्ग सुरु असताना बिहारमध्ये निवडणुका होत आहेत. प्रत्येक पक्षाने प्रचारासाठी तसेच निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसल्याचं दिसतंय. केंद्र सराकरने लागू केलेले कृषी कायदे, हाथरस बलात्कार प्रकरण या सर्व घटनांच्या पर्श्वभूमीवर या निवडणुका होत आहेत. त्यामुळे यावेळी बिहार निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
Bihar Election 2020 | बिहारमध्ये राष्ट्रवादीही निवडणूक लढवणार, स्टार प्रचारकांची यादी तयार
बिहारसाठी काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातून फक्त संजय निरुपम यांचा समावेश
(BJP has announced a list of 30 star campaigners for the Bihar Assembly elections)