Sanjay Raut : शिंदेंचे चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे; सुरतमध्ये बंडखोरांना कोणता मंत्र मिळाला? राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल

एकनाथ शिंदे हे चाळीस बंडखोर आमदारांना घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र शिंदेंचे हे बंड म्हणजे भूकंप नव्हे, अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टीकून असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : शिंदेंचे चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे; सुरतमध्ये बंडखोरांना कोणता मंत्र मिळाला? राऊतांचा 'रोखठोक' सवाल
संजय राऊत Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 9:26 AM

मुंबई: पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपावर (BJP) निशाणा साधाला आहे. शिवसेनेतून 40 आमदारांनी बंड केले. हे आमदार आधी सुरतला गेले आणि तिथून पुढे त्यांना आसामला नेण्यात आले. या आमदरांचे नेतृत्त्व एकनाथ शिंदे हेच करत आहेत. मात्र या नाट्याचे खरे सूत्रधार भाजपाचे दिग्दर्शकच असल्याची टीका संजय राऊत यांनी आपल्या सामनामधील रोखठोक या सदरात केली आहे. राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, भाजपाची महाशक्ती आपल्या पाठिशी उभी आहे, अशी कबुलीच एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हे आमदार जेव्हा सुरतला गेले तेव्हा या आमदारांच्या रक्षणासाठी भाजपाचे लोक उपस्थित होते असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मग आमदारांची व्यवस्था का करतात?

भाजप म्हणते आमचा या बंडखोरीशी काहीही संबंध नाही, मग हे आमदार नेमके सुरतलाच का गेले. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. या बंडखोर आमदारांच्या सेवेत तेथील सरकारने आपली पूर्ण यंत्रणा लावली. त्यानंतर त्या आमदारांना स्पेशल विमानाने आसाममध्ये हलवण्यात आले. या आमदारांची पुढील व्यवस्था आसाम सरकारने केली. आसाममध्ये देखील भाजपाचे सरकार आहे. मग जर भाजपाचा या बंडखोरीशी काही संबंध नसेल आणि हा शिवसेनेचा अंतर्गत मामला असेल तर भाजपाचे लोक या बिऱ्हाडाची एवढी कडकोट व्यवस्था का करत आहेत. या आमदारांना पहिल्यांदा सूरतमध्येच का नेण्यात आले? तिथे त्यांना कोणता मंत्र देण्यात आला असे अनेक सवाल संजय राऊत यांनी रोखठोकमधून उपस्थित केले आहेत.

हे सुद्धा वाचा

अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टिकले

एकनाथ शिंदे हे चाळीस बंडखोर आमदारांना घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र शिंदेंचे हे बंड म्हणजे भूकंप नव्हे, अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टीकून आहे. आमदार येतात, जातात मात्र पक्ष संघटन ठाम असते. शिवसेनेतून भूजबळ फुटले, राणे फुटले हे मान्य की त्यांना एवढ्या आमदारांचे समर्थन मिळाले नाही. मात्र त्याचा परिणाम काय झाला? भूजबळांना समर्थन असून देखील त्यांचा पराभव झाला. तसेच राणे यांना देखील मोठा फटका बसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.