दाऊदच्या बायकोशी संबंध जोडले, मंत्रिमंडळातून काढलं, तिकीट नाकारलं, रोहिणीला पाडलं : खडसेंचे हल्ले सुरुच
मला छळण्याचा प्रयत्न केला गेला. मला तिकीट न देणं, मुलीला तिकीट देऊन पक्षातीलच लोकांनी पाडलं." अशी टीका एकनाथ खडसे यांनी (Eknath khadse criticizes bjp) केली.
नवी दिल्ली : “मला जाणीवपूर्वक छळण्यात आलं. मंत्रिमंडळातून बाहेर काढताना जगाला न पटणारे आरोप केले. दाऊदच्या बायकोशी संबंध जोडले. विधानसभेला तिकीट नाकारलं. शिवाय मुलीला तिकीट देऊन स्वत:च्या पक्षातील लोकांनी जाणीवपूर्वक पाडले,” असा हल्लाबोल भाजप नेते एकनाथ खडसे यांनी (Eknath khadse criticizes bjp) केला.
“मंत्रिमंडळातून बाहेर काढताना माझ्यावर जे आरोप झाले ते मान्य नसणारे होते. मला छळण्याचा प्रयत्न केला गेला. मला तिकीट न देणं, मुलीला तिकीट देऊन पक्षातीलच लोकांनी पाडलं.” अशी टीका एकनाथ खडसे यांनी (Eknath khadse criticizes bjp) केली.
भाजप नेते एकनाथ खडसे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले आहेत. दिल्लीत महाराष्ट्राचे प्रभारी भुपेंद्र यादव यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले आहे. यावेळी माध्यमांशी बातचीत करताना त्यांनी भाजपवर हल्ला चढवला.
“पक्षात माझ्यावर वेगवेगळे आरोप लावून मंत्रिपदावरुन काढण्याचं राजकारण केलं जात आहे. इतकंच काय तर आपल्याच लोकांना हरवण्याचा काम देखील केलं जात आहे. याचे पुरावे मी मांडलेले आहे. त्यामुळे मी याबाबत नक्की विचार करेन. पण पक्ष सोडणार नाही.” असेही खडसेंनी स्पष्ट (Eknath khadse criticizes bjp) केले.
रोहिणी हरल्यानंतर एकाचीही फोन नाही
“पूर्वी वरिष्ठांना सन्मान दिला जात होता. मात्र हल्ली वरिष्ठांचा सन्मान कमी होतोय. पूर्वी सांघिक, पारिवारिक वातावरण होतं, मात्र हल्ली व्यक्तीपूजा होत आहे. पक्षापेक्षा व्यक्ती मोठी हे वातावरण निर्माण झालं आहे हे घातक आहे. संघभावना कमी झाली आहे. एकमेकांशी संपर्क पाहिजे. इथे बोलायला तयार नाहीत. रोहिणी खडसेंचा पराभव झाला तर एकाही वरिष्ठाचा फोन आला नाही. आम्ही सरपंच जरी हरला तरी त्याची भेट घेऊन विचारपूस करत होतो,” असं म्हणत खडसेंनी पक्षनेतृत्त्वावर हल्लाबोल केला.
..तर वेगळा विचार
“अशाप्रकारे सातत्याने पक्षातील व्यक्तींकडूनच अन्याय, छळवणूक होत असेल तर वेगळा विचार करावा लागेल. वेगळा विचार म्हणजे पक्ष सोडणं नाही. पक्षविस्तार, संघ परिवार, संघटनेचं काम करणे होय,” असं खडसे म्हणाले.
व्हिडीओ, ऑडिओ पुरावे
“पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. ज्यांनी विरोधात काम केलं आहे, त्यांचे व्हिडीओ, ऑडिओ, फोटो असे पुरावे आहेत. पक्ष कारवाई करणार नसेल, तर अन्य कामगिरी केलेली बरोबरी,” अशी हतबलता खडसेंनी व्यक्त केली.
जे 2014 मध्ये युती नसताना जमलं, ते 2019 मध्ये का नाही?
“2014 मध्ये भाजपने 122 +1 अशा 123 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी युती नव्हती. मात्र आम्ही संघटितरित्या काम केलं, राज्यात युती नव्हती, सत्ता नव्हती. तरीही कार्यकर्त्यांनी जिद्दीने सत्तापरिवर्तन केलं. 122 जागा जिंकल्या. युती नसताना 122 जिंकल्या, मात्र 2019 मध्ये सत्ता-पैसा होता, तरीही 105 जागा का मिळाला? स्ट्राईक रेट वाढला म्हणता… पण युती होती तर जास्त जागा यायला हव्या होत्या. याला कोण जबाबदार? त्याचं चिंतन करण्याची गरज आहे. अन्यथा असंच वातावरण राहिलं तर निवडणुकांना सामोरं जाणं अवघड होईल.” असे प्रश्नही खडसेंनी उपस्थित (Eknath khadse criticizes bjp) केले.
“मी सक्रीय राजकारणात होतो आणि राहणार आहे. पक्ष वाढवण्यासाठी आम्ही काम केलं आहे. आम्ही भाजपचा चेहरा बदलला. त्याला बहुजनांचा पक्ष केला. मात्र मंत्रिमंडळातून बाहेर काढताना जे आरोप केले होते. ते मान्य नसणार होते. मला छळण्याचा प्रयत्न केला गेला.” असेही खडसे यावेळी म्हणाले.