परळीत पंकजा मुंडेंचे हजारो बॅनर झळकले, ना भाजपचा, ना कमळाचा उल्लेख!
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Mundes banner) या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
बीड : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Mundes banner) या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत (Pankaja Mundes banner) स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांच्यासह दिग्गज नेते हजर राहणार आहेत. 12 डिसेंबर अर्थात उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.
महत्त्वाचं म्हणजे पंकजा मुंडेंच्या या मेळाव्यातून भाजप गायब असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. पंकजांच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपचं कमळ चिन्ह नाही. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेही नाहीत. त्यामुळे पंकजांनी खरंच वेगळा मार्ग निवडला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडेंच्या भूमिकेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
उद्या 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी उद्याच्या दिवशी स्वाभिमान दिवस असा नारा देत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. उद्याच्या कार्यक्रमानिमित्त लोकनेत्याला अभिवादन करणारे हजारो बॅनर्स शहरात लावण्यात आले आहेत. मात्र यातील एकाही बॅनरवर भाजपचे चिन्ह नाही. यामुळे तर्कवितर्क काढले जात आहेत.
भाजपच्या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या पंकजांचं ट्विट
आजारी असल्यामुळे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला काल (सोमवार) अनुपस्थित होत्या. त्यानंतर रात्री बारा वाजून सात मिनिटांनी ट्वीट (Pankaja Munde Tweets after BJP Meeting) करत पंकजा मुंडे यांनी येत्या बारा तारखेला गोपीनाथ गडावर उपस्थित राहण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे.
’12 डिसेंबर ‘ रोजी सकाळी 11 वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना ‘गोपीनाथ गड’ येथे आमंत्रण. तुम्ही सारे या.. हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे आहे. तुम्ही ही या.. वाट पहाते’ असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
फेसबुक पोस्ट
पंकजा मुंडे (Pankaja munde facebook post) यांनी फेसबुक पोस्ट लिहून पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. येत्या 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भेटू, अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली आहे. “पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे” असं पंकजा मुंडेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
संबंधित बातम्या
पुढचा प्रवास ठरवण्याची वेळ आली आहे, पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट
आधी आजारपणामुळे भाजपच्या बैठकीला गैरहजर, नंतर रात्री 12 वाजता पंकजा मुंडेंचं ट्वीट
भाजपला धक्का, पंकजा मुंडे मराठवाडा बैठकीला उपस्थित राहणार नाहीत!
आधी फेसबुक पोस्ट, आता ट्विटरवर भाजपचा नामोनिशाण नाही, पंकजा मुंडेंचा पुढचा प्रवास ठरला?