Ashish Shelar : महाराष्ट्र मराठी माणसाच्या परिश्रमातून उभा राहिला; तेजस्वी इतिहासाला नख लावू नका, शेलारांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध

भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नसल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

Ashish Shelar : महाराष्ट्र मराठी माणसाच्या परिश्रमातून उभा राहिला; तेजस्वी इतिहासाला नख लावू नका, शेलारांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध
नवी जबाबदारीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 1:14 PM

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  (Bhagat Singh Koshyari) यांनी शुक्रवारी राजस्थानी समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्र आणि मुंबईतून जर  गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर मुंबईत पैसा उरणार नाही,  सध्या मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, मात्र या समाजाला जर बाहेर काढले तर मुंबईची ही ओळख पुसली जाईल असे राज्यपालांनी म्हटले होते. राज्यपालांच्या या वक्तव्याचा आता राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. भाजपा (BJP) नेते आशिष शेलार यांनी देखील राज्यपालांच्या या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये! असे  शेलार यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विरोधी पक्षांकडून निषेध

दरम्यान या वक्तव्यावरून  विरोधी पक्षातील नेत्यांकडून देखील  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्यांनी खुशाल त्या राज्यात जावून रहावे असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे देखील राज्यपालांच्या या वक्तव्यावर आक्रमक झाल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिकपद आहे, त्यामुळे त्या पदाबाबत बोलणे उचित नाही. मात्र राज्यपाल हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत असतात, त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करते असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठी माणसांना डिवचू  नका म्हणत राज्यपालांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांचा खुलासा

दरम्यान आता याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खुलासा केला आहे. मी काल जे काही बोललो त्यामध्ये मराठी माणसाला दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी फक्त गुजराती आणि राजस्थानी व्यक्तींच्या व्यवसायातील योगदानाचा उल्लेख केला. महाराष्ट्र हा मराठी मानसाच्या कष्टातूनच निर्माण झाला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक मोठे उद्योगपती दिसून येतात असे राज्यापालांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.