मर्द-षंढाशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही जे माजलेत, त्यांनी योगसाधना करावी, आशिष शेलारांचा रोख कुणावर?
'योग हा राजकीय विषय नाही. पण जे माजलेत, उन्माद करायला लागलेत आणि ज्यांच्या बोलण्यात मर्द-षंढशिवाय शब्द येत नाही त्यांनी दंड ठोकून योगा करावा म्हणजेच त्यांच्या जीवनात समतोल साधला जाईल आणि त्यांच्या बोलण्यात साधनसूचिता येईल', आशिष शेलार यांचा रोख नेमका कुणावर?
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग साधने’साठी वांद्रे प्रोमेनेड येथे इस्रायलचे कौन्सुल जनरल कोबी शोशानी यांच्यासह वांद्रे, खार आणि सांताक्रूझ येथील मुंबईकर सामील झाले होते. यावेळी आशिष शेलार म्हणाले, योग ही खरोखरच तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी चांगल्या आणि निरोगी भविष्यासाठी या प्राचीन पद्धतीचा स्वीकार करण्याची शपथ घेतली पाहिजे. तर आजच्या दिवशी कुणाला योगसाधनेची गरज आहे? असा सवाल केला असता आशिष शेलार म्हणाले, योग हा राजकीय विषय नाही. पण जे माजलेत, उन्माद करायला लागलेत आणि ज्यांच्या बोलण्यात मर्द-षंढशिवाय शब्द येत नाही त्यांनी दंड ठोकून योगा करावा म्हणजेच त्यांच्या जीवनात समतोल साधला जाईल आणि त्यांच्या बोलण्यात साधनसूचिता येईल, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं. आशिष शेलार योग दिनाबद्दल बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांना खोचक टोला लगावला.