Ashish Shelar on Nawab Malik | ‘पवारसाहेब मोठे नेते, त्यांना आम्ही काय सांगणार! पण…’
Sharad Pawar : एकीकडे शरद पवारानी मलिकांवरील कारवाईचं कोणतंही आश्चर्य वाटलं नसल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे शेलार यांनी पवारांना टोला लगावला आहे. पवार साहेब एवढे मोठे नेते आहे, त्यांना आम्ही काय सांगणार, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय.
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकाममंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरील ईडी चौकशीवरुन राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. एकामागून एक राजकीय क्रिया-प्रतिक्रिया सुरु असतानाचा आता भारतीय जनता पक्षातर्फे आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून शेलार यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. शरद पवारसाहेब (Sharad Pawar) मोठे नेते आहे, त्यांना आम्ही काय सांगणार, असं वक्तव्य शेलार यांनी केलंय. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवाब मलिक यांच्या घरावर पहाटे साडेचार वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात आणण्यात आलं. यानंतर नवाब मलिक यांची चौकशी सुरु करण्यात आली. या सगळ्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर सूडाचं राजकारण कुणाकडून केलं जात आहे? या प्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले शेलार ?
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय की,…
शंका असेल तर न्यायालयाचा दरवाजा आहे. चुकीचा गैरसमज होत असेल तर जनतेचा दरबार आहे. मात्र तपास यंत्रणेच्या कारवाईला उत्तर देता येत नाही, म्हूणून भाजपवर हल्ला करायचा! याला आम्ही घाबरत नाही. या हल्ल्याला आम्ही मूळ आरोपापासून पलायन मानतो. थयथयाट तीच लोकं करतात, जी प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून जे चाललंय ते सगळं समोर आहे. ईडी एनआयएच्या ज्या कारवाया चालल्या आहेत.
राज्याचे पोलीस डोळे बंद करुन होते का? सरकारला काय माहीत नव्हतं, दाऊदचा पैसा ज्यात वापरला जातोय, त्याची कुणाला माहीत नाही का? तपास यंत्रणांना काही माहित नाही, दाऊदच्या हस्तकांपर्यंत जायचं नाही का? त्या दाऊदची बहीण कोण ती हसीना पारकर, ती गेल्यानंतरही सामान्य लोकांचे प्रॉपर्टी बळकावल्या असतील, तर तपास यंत्रणांनी डोळे बंद करायचे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची अपेक्षा आहे का?
इतकंच नाही तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनच यंत्रणावर दबाव टाकला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. हे दोन्ही पक्ष फक्त आणि फक्त गुन्हेगारांची बाजू घेतात का? हा प्रश्न आहे, असंही शेलार म्हणालेत. सगळ्या गोष्टी समोर येतात, त्याचं कॅरेक्टर सर्टीफिकेट देण्याचं काम संजय राऊतांना दिलं का?, असा सवाल शेलारांनी विचारलाय. दाऊद आणि त्यांच्या हस्तकाबाबत ईडी चौकशी करते, त्याच्यावर तुम्ही हल्ला करणार? या राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे की नाही? हस्तक कोण तर बॉम्बब्लास्टचा शिक्षापात्र आरोपी!, अशा शब्दांत शेलांरांनी भाजपवर निशाणा साधलाय.
पवारांवरुन टोला
एकीकडे शरद पवारानी मलिकांवरील कारवाईचं कोणतंही आश्चर्य वाटलं नसल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे शेलार यांनी पवारांना टोला लगावला आहे. पवार साहेब एवढे मोठे नेते आहे, त्यांना आम्ही काय सांगणार, पण सामान्य माणसाला कळतं, एवढ्या मोठ्या नेत्यांनी यापासून आपल्याला वाचवलं पाहिजे, एवढ्या मोठ्या प्रकरणात स्वत: ला जोडणं योग्य नाही, असं म्हणत त्यांनी पवारांना उद्देशून म्हटलंय.
पाहा व्हिडीओ –
संबंधित बातम्या :
‘सूडाचं राजकारण कोण करतंय हे उभा महाराष्ट्र पाहतोय’ मलिकांच्या ED चौकशीवर भातखळकरांचा टोला
‘माजी ED अधिकाऱ्याला भाजपचं UPमध्ये तिकीट’ रोहित पवारांच्या वक्तव्यामागचा ‘तो’ BJP उमेदवार हाच!
Photo | नवाब मलिक यांच्या समर्थनात कार्यकर्ते मैदानात! ED कार्यालयाबाहेर निदर्शनं, जोरदार घोषणाबाजी