जनाची नाही तर मनाची बाळगा, दसरा मेळाव्यावरुन भाजपची शिवसेनेवर टीका

दसरा मेळावा नेमका कसा होणार याबाबत अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. (Atul Bhatkhalkar Comment on Shivsena Dasara melava in savarkar smarak)

जनाची नाही तर मनाची बाळगा, दसरा मेळाव्यावरुन भाजपची शिवसेनेवर टीका
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 2:55 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार आहे. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. (Atul Bhatkhalkar Comment on Shivsena Dasara melava in savarkar smarak)

“स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या तपस्वी क्रांतिकारकाला बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मुखपत्राला पोलीस कारवाईपासून अभय देणारे मुख्यमंत्री सावरकर स्मारकात दसरा मेळावा घेतात. अहो जनाची नाही तरी मनाची…”अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. भातखळकरांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. मात्र पुनश्च हरिओम म्हणतं सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. मात्र तरीही सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध अद्याप उठवलेले नाहीत. त्यामुळं सण-उत्सव साजरे करण्यावर अजूनही बंधनं कायम आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा नेमका कसा होणार याबाबत अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात होत्या.

याबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांना विचारले असते, त्यांनी यंदाचा दसरा मेळावा हा व्यासपीठावरच होणार अशी भूमिका मांडली होती. त्यानुसार मेळाव्याचं स्वरुप काय असावं? तो कसा घेतला जावा? यावर चर्चा सुरु होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांवर अद्यापही बंधनं कायम आहेत. त्यामुळं शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा आता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार असल्याची माहिती मिळतं आहे.

स्मारकाच्या सभागृहात मेळाव्याचं व्यासपीठ उभं करुन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण लाईव्ह प्रसारित केलं जाईल, अशी सूचना मांडण्यात आली. तर पक्षाचे नेते आणि लोकप्रतिनिधींपैकी अगदी मोजक्या व्यक्तींनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल अशीही शक्यता आहे. (Atul Bhatkhalkar Comment on Shivsena Dasara melava in savarkar smarak)

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी मदत हवेय ना, मग केंद्रासोबत कटुता कशाला वाढवता- अतुल भातखळकर

शिवतीर्थावरील शिवसेनेच्या भव्य दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित, मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.