लॉटरी लागून सत्तेत, आता ठाकरे सरकार महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का?, भाजपचा सवाल
पैशांसाठी ठाकरे सरकार सुसंस्कृत महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का? (BJP leader Atul Bhatkhalkar on lottery permission)" असा सवाल भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
मुंबई : “राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ठाकरे सरकारचा ऑनलाईन जुगाराला अधिकृत करुन गरिबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. पैशांसाठी ठाकरे सरकार सुसंस्कृत महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का? (BJP leader Atul Bhatkhalkar on lottery permission)” असा सवाल भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. आयपीएल सुरु होत असलेल्या दिवशीच याची माहिती लोकांना होणे म्हणजे सध्या सुरु असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंगला अभय देण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे का? असाही प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केला.
अतुल भातखळकर म्हणाले, “राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऑनलाईन जुगाराला अधिकृत करणे कितीपत योग्य आहे यासाठी वित्त विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षेखाली समिती नेमून अहवाल मागविला होता. त्या अहवालानुसार राज्यात लवकरच जुगाराला अधिकृत करणार असल्याचे संकेत या सरकारने दिले आहेत. राज्याला यातून नाममात्र रक्कम मिळेल, परंतु त्यामुळे राज्यातील लाखो कुटुंब उद्ध्वस्त होतील. सरकारने याचा विसर पडू देऊ नये. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे.
“राज्याचं करेत्तर उत्पन्न वाढवण्यासाठी इतर चांगले मार्ग शोधायचे सोडून सरकार गरिबांना उद्ध्वस्त करण्याचा मार्ग स्वीकारत आहे. यातून ठाकरे सरकारच्या नीतिमत्तेची पातळी दिसून येते. लॉटरी लागून सत्तेत आलेले हे सरकार जुगाराला पाठिंबा देणारच ना असा टोलाही अतुल भातखळकर यांनी महाविकासआघाडीला लगावला.
“लॉटरी लागून सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारकडून जुगाराला पाठिंबा”
अतुल भातखळकर म्हणाले, “कोणाच्या तरी हट्टापायी नाईट लाईफ सुरु करुन मुंबईतील तरुणांना नशेच्या आहारी लावण्याचे पाप या सरकारने या पूर्वीच केले आहे. राज्यात अमली पदार्थ तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे सोडून आता पैशांसाठी जुगार अड्डे सुरु करण्याचा प्रयत्न ह सरकार करत आहे. पैशांसाठी ठाकरे सरकार पुढील काही दिवसांमध्ये डान्स बारही सुरु करेल.”
हेही वाचा :
मुंबई महापालिकेचा कोरोनावर 1300 कोटींचा खर्च, पहिल्यांदाच बँकेतील ठेवींना हात
मनसेचा सविनय कायदेभंग, बंधन झुगारुन येत्या सोमवारी लोकलने प्रवास करणार
BJP leader Atul Bhatkhalkar on lottery permission