मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही, रोहित पवारांचे नाव न घेता चंद्रकांत पाटलांची टीका

"मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काही माणसांना प्रसिद्धीच मिळत नाही (Chandrakant Patil on Rohit Pawar)

मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही, रोहित पवारांचे नाव न घेता चंद्रकांत पाटलांची टीका
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 10:34 AM

पुणे : “मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काही माणसांना प्रसिद्धीच मिळत नाही (Chandrakant Patil on Rohit Pawar), अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांचे नाव न घेता केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली (Chandrakant Patil on Rohit Pawar).

“मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काही माणसांना प्रसिद्धीच मिळत नाही. अशा माणसांना माध्यमांनी सांगण्याची गरज आहे. रोहित पवार हे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मोठ्या नेत्यांवर टीका करत असतात”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

अजित पवारांवरही चंद्रकांत पाटलांची टीका

नुकतेच चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. त्यासोबत टीका करताना चंद्रकात पाटील यांची जीभ घसरली आहे. सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत”, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर टीका केली.

“पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील, तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका. आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. कोथरुड येथे भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.

राज्यातील हे सरकार दिशाहीन सरकार – चंद्रकांत पाटील

“राज्यातील हे सरकार दिशाहीन सरकार आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही, सरकारमध्ये कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. मुख्यमंत्री तर मातोश्री मध्येच बसलेले असतात”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या :

सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत; अजितदादांवर टीका करताना चंद्रकांतदादांची जीभ घसरली

Maratha Protest | “मराठ्यांना OBC त टाकणं चुकीचे” : चंद्रकांत पाटील

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.