समाधान आवताडेंचा विजय महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्यासारखा, चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

समाधान आवताडेंचा विजय महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्यासारखा आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. (samadhan autade pandharpur mangalwedha by election)

समाधान आवताडेंचा विजय महाविकास आघाडीच्या थोबाडीत मारल्यासारखा, चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 4:40 PM

पुणे : देशात 5 विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबतच आज (2 मे) पंढरपूर मंगळवेढा (Pandharpur Mangalwedha by election) या विधनासभेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. मात्र, सध्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालानंतर येथे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांचाच विजय होण्याची शक्यता आहे. ते हजारो मतांनी सध्या आघाडीवर आहेत. याच विजयाच्या शक्यतेमुळे भाजपमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. या विजयाविषयी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली. त्यांनी समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा आहे,  असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) भाष्य केले. ते पुण्यात ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (BJP leader Chandrakant Patil criticizes Maha vikas aghadi on victory of BJP candidate Samadhan Autade in Pandharpur Mangalwedha by election)

चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी येथे मतमोजणी सुरु आहे. या जागेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र मैदानात उतरले होते. तिन्ही पक्षांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न केला होता. मात्र, सध्या मतमोजणीमध्ये पंढरपूरमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आघाडीवर आहेत. त्यावर भाष्य़ करताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर कठोर शब्दांत टीका केली. समाधान आवताडे याचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखं आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसच्या राजकीय अस्तित्वाबद्दल भाष्य केले. त्यांनी पाच राज्यांच्या निकालानंतर देशात काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे, अशी शेलकी टीका केली.

फडणवीस जे बोलतात ते करुन दाखवतात

यावेळी पुढे बोलताना त्यांनी भाजप यानंतरच्या सर्व निवडणुकीत संघटनात्मक पद्धतीने काम करणार असे सांगितले. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात. पाच राज्यांच्या निकालामुळे काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे. यापुढच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही संघटनात्मक पद्धतीने काम करणार,” असे चंद्रकांत पाटील.

दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा या जागेसाठी अजूनही मतमोजणी सुरुच आहे. सध्या हाती आलेल्या ताज्या निकालानुसार मतमोजणीच्या 35 व्या फेरीत भाजपचे समाधान आवताडे हे 4395 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना एकूण 101607 मते मिळाली असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना आतापर्यंत 97212 मते मिळाली आहेत. अजूनही येथील मतमोजणी सुरुच आहे.

इतर बातम्या :

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नंंदीग्राममधून ममता दीदी जिंकल्या, अटीतटीच्या लढतीत तृणमूलचा विजय

Belgaum Election Result 2021 LIVE | सतीश जारकीहोळींना पुन्हा आघाडी, मंगला अंगडी पिछाडीवर

West Bengal Election Results 2021 LIVE: ममता बॅनर्जींनी नंदीग्रामची लढाई जिंकली; चुरशीच्या लढतीत सुवेंदू अधिकारींचा 3727 मतांनी पराभव

(BJP leader Chandrakant Patil criticizes Maha vikas aghadi on victory of BJP candidate Samadhan Autade in Pandharpur Mangalwedha by election)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.