मुंबई: केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयाकडून प्राथमिक चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग धाड घालण्यासाठी करत आहे. या माध्यमातून सीबीआय अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची बदनामी करून राजकीय उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. (NCP leader Jayant Patil slams CBI after raids on Anil Deshmukh house)
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही, याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री श्री. @AnilDeshmukhNCP यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला व सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण ४ जणांची चौकशी झाली, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. मा.उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’चे आदेश दिलेले होते.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 24, 2021
अँटिलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
तब्बल 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने शनिवारी छापे टाकले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे मुंबईपासून ते नागपूरपर्यंतच्या अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. एकूण दहा ठिकाणी हे छापे मारले आहेत. मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटवर पहाटेच सीबीआयने छाप मारले आहेत. ही छापेमारी करताना स्थानिक पोलिसांना त्यांची गंधवर्ताही देण्यात आली नव्हती. छापेमारीचं वृत्त कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त वाढवला आहे.
पीपीई किट्स घालून सीबीआयचे अधिकारी छापेमारी करत आहेत. यावेळी एक काळी बॅग आणि दोन मोठ्या पिवळ्या पिशव्याही सीबीआय अधिकाऱ्यांच्या हातात दिसत आहेत. त्यामुळे या बॅग आणि पिशव्यांमध्ये नक्की काय आहे? याचे गूढ वाढले आहे.
संबंधित बातम्या:
रोज उठून त्यांचं नाटक चाललंय, केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी: चंद्रकांत पाटील
Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; संजय राऊत म्हणतात…
(NCP leader Jayant Patil slams CBI after raids on Anil Deshmukh house)