Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्या सरकारच्या काळात फायद्यात असलेली महावितरण कंपनी 11 महिन्यात तोट्यात कशी?, चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

आमच्या सरकारच्या काळात फायद्यात असलेले महावितरण 11 महिन्यात तोट्यात कसे गेले, हा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे. | Chandrashekhar Bawankule

आमच्या सरकारच्या काळात फायद्यात असलेली महावितरण कंपनी 11 महिन्यात तोट्यात कशी?, चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल
Chandrashekhar Bawankule
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 2:18 PM

नागपूर: महावितरण महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे, आमच्या सरकारमध्ये तीन्ही कंपन्या फायद्यात होत्या. आमच्या काळात फायद्यात असलेली महावितरण कंपनी 11 महिन्यात तोट्यात कशी?, असा सवाल भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारला विचारला.  राज्य सरकारने वीजबिल माफीसाठी 5 हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी बावनकुळे यांनी मागणी केली आहे. यापूर्वी अनेक वेळा राज्य सरकारने अनुदान दिल्यानंतर वीजबिल माफी झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (BJP leader Chandrashekhar Bawankule criticize MVA Govt on electricity bill issue)

राज्यात भाजपचं सरकार असातना आम्ही पाच लाख वीज कनेक्शन आम्ही दिले आहेत. आम्ही राज्यातील 1 कोटी आर्थिक दुर्बल ग्राहकांचे घरगुती वीज बिल माफ करावे, यासाठी चार महिन्यापासून सरकारकडे मागणी करत आहोत. दिल्ली सरकारप्रमाणे 100 युनिटपर्यंत वीज माफ करु, अशी घोषणा सरकारने केली. पण, 11 महिने होऊन अंमलबजावणी का झाली नाही, हा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.

लॉकडाऊन काळातील गरिबांचं वीज बिल माफ करण्याची घोषणा सरकारने केली होती. पण, वीज बिल माफ केलं नाही. पाच कोटी जनता वीजबिल माफीची जनता वाट पाहत होती.  या सरकारनं आता घोषणा केली वीज बिल माफ करणार नाही, ही घोषणा केली. (BJP leader Chandrashekhar Bawankule criticize MVA Govt on electricity bill issue)

चौकशी करा पण वीजबिल माफी द्या

राज्य सरकारने 59149 कोटी थकबाकी महावितरणवर आहे, याची चौकशीची घोषणा केली आहे. सरकारने लवकर चौकशी करावी आणि एक महिन्यात रिपोर्ट सादर करावा. सरकारनं चौकशी करत राहावे, पण आधी वीज बिल माफी द्या, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. आमच्या सरकारच्या काळात देशातील सर्वात जास्त वीज उत्पादन आणि वितरणाचा रेकॉर्ड केला, तेव्हा तांत्रिक अडचण आली नाही, पण यांच्या काळात आली. (BJP leader Chandrashekhar Bawankule criticize MVA Govt on electricity bill issue)

महावितरणची 56149 कोटी थकबाकी आहे, याची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यापैकी 16525 कोटींची थकबाकी गेल्या सरकारमधील होती. कृषी पंपांची 40 हजार कोटींची थकबाकी आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांची वीज कापली नाही. शेतकऱ्यांना वीज देणे चूक असेल तर आम्ही चुक केली हे मान्य करतो. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना ३२६६९ एमयू जास्तीची वीज दिली, असल्याचे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

वीजबिल माफ केलं नाही तर सोमवारी संपूर्ण राज्यात वीज बिलाची होळी करण्यात येई, असा इशार भाजपनं दिला आहे. महावितरणने एकाही ग्राहकांची वीज तोडली तरी भाजप त्याच्यासोबत उभे राहणार आहे, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारवरुन जनतेचा विश्वास उडाला, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Chandrashekhar Bawankule | “मविआ सरकारमध्ये सर्व प्रकरचे अवैध धंदे” – चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

(BJP leader Chandrashekhar Bawankule criticize MVA Govt on electricity bill issue)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.