मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. सचिन वाझेला गृहमंत्र्यांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केलाय. त्याबाबत अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (Chitra Wagh Comment on Anil Deshmukh Resignation)
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच एखादा चेहरा बदलल्याने महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही. अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली.
Home Minister of Maharshtra @AnilDeshmukhNCP Finally Resigns !
Now the question arises that who will be the New Vasooli Minister??
Change of face won’t change the Corrupt intentions of the MVA Government.@Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra#AnilDesmukh
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 5, 2021
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात उठलेलं वादळ अद्याप शमलेलं नाही. या प्रकरणात अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान या प्रकरणाचा तपास CBI मार्फत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावरुन आपण राजीनामा देत असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गंभीर आरोप केलाय. राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु असल्याचं भातखळकर यांनी म्हटलंय. इतकच नाही तर CBI ने याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.
राजीनामा पत्रं, जसंच्या तसं
प्रति
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आदरणीय महोदय,
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.
त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत :हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.
सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती
आपला
अनिल देशमुख
(Chitra Wagh Comment on Anil Deshmukh Resignation)
संबंधित बातम्या :
Anil Deshmukh resign: अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं