दिल्ली भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप नेत्याकडून नाव न घेता गौतम गंभीर यांच्या चौकशीची मागणी
देशाची राजधानी दिल्लीमध्ये भाजपातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. भाजप नेत्याने गौतम गंभीर यांचे नाव न घेता चौकशीची मागणी केली आहे.
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) भाजपातील (BJP) अंतर्गत वाद उफाळून आला आहे. दिल्ली पूर्वमधील गांधीनगरचे भाजपा आमदार अनिल वाजपेयी यांनी भाजपा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी उपराज्यपालांकडे तक्रार देखील केली आहे. एनजीओंना डपिंग ग्राऊंडसाठी आरक्षीत असलेली जागा अवैध पद्धतीने वाटण्यात आली आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी आमदार अनिल वाजपेयी यांनी केली आहे. डपिंग ग्राऊंडसाठी आरक्षीत असलेल्या काही जागांवर दिल्ली पूर्वमध्ये पुस्तकालय आणि सामूहिक अन्नछत्र चालवण्यात येत असल्याचा आरोप वाजपेयी यांनी केला आहे.
आरोपाचा रोख गौतम गंभीर यांच्याकडे?
दरम्यान आमदार वाजेपेयी यांनी कोणाचंही नाव न घेता उपराज्यपालांकडे तक्रार केली आहे. डपिंग ग्राऊंडसाठी आरक्षीत जागेचा इतर कामासाठी उपयोग होत असल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. वाजेपीये यांचा रोख हा भाजपा खासदार गौतम गंभीर यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे. कारण गौतम गंभीर यांनी आपल्या स्वयंमसेवी संस्थेच्या माध्यमातून गरींबासाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. जीथे दररोज अवघ्या एक रुपयामध्ये तीन हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था होते. तसेच याठिकाणी एक पुस्तकालय देखील उभारण्या आले आहेत. त्यामुळे वाजपेयी यांनी जरी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा गंभीर यांच्याकडेच असल्याचं बोललं जात आहे.
कोणतीही परवानगी घेतली नाही
गौतम गंभीर हे एनजीओच्या माध्यमातून दररोज तीन हजार लोकांच्या जेवनाची व्यवस्था करत आहेत. याबाबत गौतम गंभीर यांनी बोलताना सांगिते होते की, आम्ही ही योजना सुरु करण्यासाठी कोणाचीही परवानगी घेतलेली नाही. जर दिल्लीच्या सरकारला आमची ही योजना बंद पाडायची असेल तर ते पाडू शकतात. आम्ही जर परवानगी घेण्याचा निर्णय घेतला असता तर अनेक अडचणींचा सामना कारवा लागला असता.