पवार वडिलांच्या वयाचे, त्यांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याच्या सीनियर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची आहे : फडणवीस

माझ्या खांद्यावरुन वांद्र्याच्या सीनियरवर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची आहे," असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना (Devendra fadnavis on Sharad Pawar) लगावला.

पवार वडिलांच्या वयाचे, त्यांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याच्या सीनियर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची आहे : फडणवीस
Follow us
| Updated on: Jun 11, 2020 | 10:24 AM

मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याच्या सीनियरवर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची आहे,” असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला. देवेंद्र फडणवीस आज कोकण दौरा करणार आहे. या दौऱ्यापूर्वी फडणवीसांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. (Devendra fadnavis on Sharad Pawar)

“शरद पवारांचं जे म्हणणं आहे मी ऐकलं. मी विदर्भातला आहे, मी समुद्राची पाहणी करायला चाललो आहे. मात्र मी अनेकदा बारामतीत गेलो आहे. मात्र तिथे मला काही समुद्र दिसला नाही,” असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“जर आपल्याला बीसीसीआयचा अध्यक्ष व्हायचं असेल तर तेंडूलकर आणि गावस्करला प्रशिक्षण द्यावं अशी अट नाही,” असा टोलाही फडणवीसांनी पवारांना लगावला.

“सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहे. जर माझे वडील असते तर ते त्याच वयाचे असते. शेवटी प्रत्येक बापाला हेच वाटतं की, आपल्या पोराला आपल्यापेक्षा कमी समजतं. पोरगा कितीही पुढे गेला तरी बापाची तिचं भावना असते,” असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

“कदाचित पवारांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याच्या सिनियरवर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची आहे आणि काही तरी करा असे सांगायचं असेल,” असेही ते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

कोकणासाठी साडेसात हजार कोटींचं पॅकेज द्या

“राज्य सरकारने निसर्ग चक्रीवादळाचे नुकसान झालेल्या जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी आहे. कोकणासाठी किमात सात ते साडेसात हजार कोटींचं पॅकेज द्यावं तरचं कोकण पुन्हा उभारता येईल,” अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी कोकण दौऱ्यावर निघण्यापूर्वी केली.

“सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तोकडी आहे. आम्ही सातत्याने सांगत आहोत की नुकसान अत्यंत मोठं आहे. सरकारसमोर मागील वेळेला कोकण आणि कोल्हापूरसाठी केलेली मदत त्यांच्यासमोर आहे. आम्ही चालू कर्ज माफ केली होती. त्याच्या तीन पट पैसे दिले होते.”

“आता फळबागांचं नुकसान झालं आहे. त्यावेळी आपण पिकालाही तीन पट पैसे दिले होते. ते असं भरुन काढता येणार नाही. त्यासाठी आपल्याला झाडांचा विचार करुन पैसे द्यावे लागेल.”

“आम्ही 15 हजार रोख द्या, ही मागणी केली होती. ती सरकारने मान्य केली नाही. भांड्या-कुंड्यासाठी अत्यंत तोकडी मदत सरकार देत आहे.”

“फक्त दोन तीन ठिकाणी त्यांनी पैसे वाढवले आहेत. घरांसाठी आपण प्रधानमंत्री आवास योजनेला जेवढे पैसे मिळतात. शहरात ग्रामीण भागात त्याशिवाय sdrf असे मिळून आपण जर विचार केला तर ग्रामीण भाग तीन लाख तर शहरी भागात चार लाखापर्यंत पैसे दिले होते. आता सरकारने सर्व मिळून दीड लाख दिले आहे. त्यामुळं लोकांचे घर कशी बनतील,” असा प्रश्नही फडणवीसांनी सरकारला विचारला.

तसेच सरकारने एकूण जे पॅकेज दिले आहे. ते अत्यंत तोकडं पॅकेज आहे, असेही फडणवीस म्हणाले.  (Devendra fadnavis on Sharad Pawar)

शरद पवार काय म्हणाले होते?

शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यावरुन टोलेबाजी केली होती. “मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत, तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल”, असं म्हणत शरद पवार यांनी उपरोधात्मक टोला लगावला.

संबंधित बातम्या : 

समुद्राशी संबंध नसलेल्या फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल, कोकण दौऱ्यावरुन पवारांचा टोला

शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच, विरोधकांनी बोंब मारुन पोट आणि घसा दुखवू नये, सामनातून भाजपवर टीका

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.