VIDEO : खडसेंबाबत प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर हात जोडले
पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही असे म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी चक्क माध्यमांसमोर हात (Devendra fadnavis not answer eknath khadse question) जोडले.
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अतंर्गत वाद सुरु आहे. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावरुन केलेल्या भाषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर घणाघात केला (Devendra fadnavis not answer eknath khadse question) होता. पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही असे म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी चक्क माध्यमांसमोर हात (Devendra fadnavis not answer eknath khadse question) जोडले.
ठाण्यातील कोपरी येथे न्यू गावदेवी भाजी मार्केट आणि तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. यासाठी देवेंद्र फडणवीस ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकनाथ खडसे यांच्याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हात जोडले. “बोललो बोललो, सगळं बोललो,” असेही फडणवीस यावेळी म्हणाले. यानंतर ते मुंबईला रवाना झाले.
पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही : एकनाथ खडसे
“देवेंद्र फडणवीसांना पक्षाचा अध्यक्ष (प्रदेशाध्यक्ष) करायचं हे गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं, मुंडे साहेबांनी सांगितलं म्हणून मी संमती दिली, पण ज्यांनी मोठं केलं त्यांनाच अशी वागणूक दिली”, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला होता.
“मला सांगतात पक्षाच्या विरोधात बोलू नका, पण मी पक्षाच्या विरोधात कधी बोललोच नाही, मला पक्ष आणि नेते प्रिय, पण एकीकडे तोंडावर प्रेम करायचं आणि मागून पाडायचं हे आम्हाला दिसतं, हे घडलं नाही, घडवलं,” असाही घणाघात एकनाथ खडसे यांनी (Devendra fadnavis not answer eknath khadse question) केला.
“अजून पक्ष सोडायचा ठरलेलं नाही, मी पंकजाबद्दल बोलतोय, माझा भरोसा नाही, पक्षातून काढत नाहीत, आपोआप सोडून जातील अशी परिस्थिती करतात, आणि सांगायचं गोपीनाथ मुंडे असते, तर एकनाथ खडसेच मुख्यमंत्री झाला असता, माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, पण इथे बोलायला वेळ नाही,” असं एकनाथ खडसे म्हणाले.
VIDEO : खडसेंबाबत प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर हात जोडले pic.twitter.com/qrY4ToqgJS
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 13, 2019