वैयक्तिक आयुष्यातील दखल क्षमा करण्यासारखी नाही, फोन टॅपिंगप्रकरणात खडसे कडाडले

कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात दखल घेणं हे केव्हाही क्षमा करण्यासारखं नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले. टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधताना, फोन टॅपिंगबाबत भाष्य केलं.

वैयक्तिक आयुष्यातील दखल क्षमा करण्यासारखी नाही, फोन टॅपिंगप्रकरणात खडसे कडाडले
Follow us
| Updated on: Feb 06, 2020 | 12:00 PM

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी फोन टॅपिंगप्रकरणात (Eknath Khadse Phone tapping) आपली प्रतिक्रिया दिली आहे. “जर माझाही फोन टॅपिंग झाला असेल तर ते दुर्दैवी असेल, कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात दखल घेणं हे केव्हाही क्षमा करण्यासारखं नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले. टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधताना, फोन टॅपिंगबाबत भाष्य केलं. (Eknath Khadse Phone tapping)

एकनाथ खडसे म्हणाले, “वृत्तपत्रातील बातम्यांमुळे समजलं की माझाही फोन टॅप केला जात होता. परंतु माझा अजूनही विश्वास नाही की माझा फोन टॅप केला असेल. पण असं जर झालं असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात दखल घेणं हे केव्हाही क्षमा करण्यासारखं नाही. त्याची कारणं काही असतील ते चौकशी अंती समोर येईल”.

प्रश्न : सत्ताधारी भाजपमध्ये होता, 4 वर्षे सत्तेबाहेर राहिलात. तुमचा फोन टॅपिंगची गरज का पडली असावी?

एकनाथ खडसे : माझा फोन केला की नाही हे माहीत नाही, त्याबाबत संभ्रम आहे. केला असेल की नसेल ते आता चौकशी समितीच्या माध्यमातून बाहेर येईल. त्यानंतर यावर प्रतिक्रिया देणं योग्य होईल. अशा पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्याही नेत्यांचे फोन टॅप केले जात असतील तर त्याचं कारण वेगळं असू शकतं. अंतर्गत स्पर्धा असू शकते, त्या स्पर्धेच्या माध्यमातून असे उद्योग केल्याचे पूर्वीची उदाहरणे आहेत. पण जोपर्यंत निष्कर्ष येत नाहीत, तोपर्यंत यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही.

प्रश्न : तुम्हीही विरोधी पक्षनेते होता. यापूर्वीही असे प्रकार घडलेत, काही अधिकाऱ्यांची नावं समोर येत आहेत, तुमचा अनुभव काय?

एकनाथ खडसे : मी विरोधी पक्षनेता असताना, बरेच वरीष्ठ अधिकारी, जे पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणेत आहेत, ते अधून मधून मला जाणून द्यायचे की तुमचे फोन टॅप होत आहेत, किंवा सर्विलन्सवर ठेवले आहेत.  कदाचित सत्तापक्षात असताना अशाप्रकारचं सर्विलन्स झालं असेल. निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी फोन टॅप गेले असतील. पण राज्यकर्ता म्हटलं की त्याच्या सोईसाठी असे उद्योग होत असतात. त्यातला हा एक उद्योग असावा.

प्रश्न : भाजप हे राज्यकर्ते होते, त्यांना भाजपचा नेता अडचणीचा वाटला असावा का?

एकनाथ खडसे : जोपर्यंत याची चौकशी होत नाही, तोपर्यंत यावर बोलणं योग्य ठरणार नाही. चौकशीनंतर मात्र मोकळेपणाने बोलेन.

प्रश्न :  सरकारकडून काय अपेक्षा?

एकनाथ खडसे : चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि तथ्य समोर आणून संभ्रमाचं वातावरण दूर करावं.

एकनाथ खसडेंचा ही फोन टॅप?

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप केल्याचा आरोप होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ (Eknath khadse Phone Tap) उडाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विरोधकांप्रमाणे खडसेंचाही फोन टॅप करण्यात आला, अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

महाराष्ट्रातील काही नेत्यांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

चौकशी समितीची नियुक्ती

“ज्यांची गेल्या पाच वर्षात सत्ता होती, त्यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप ( HM Anil Deshmukh on Phone tapping) केले होते. त्याबाबतच्या तक्रारीनंतर एक समिती तपासासाठी नेमण्यात आली आहे. दोन अधिकारी या समितीत आहेत”, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख ( HM Anil Deshmukh on Phone tapping)यांनी दिली.

“दोन अधिकाऱ्यांच्या समितीमध्ये श्रीकांत सिंग आणि अमितेश कुमार हे दोन अधिकारी आहेत. कोण कोण अधिकारी इस्त्रायलला गेले होते त्याचा तपास होईल. चौकशी समितीला सहा आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे”, असं अनिल देशमुख म्हणाले.

भाजपवर फोन टॅपिंगचा आरोप

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. फोन टॅपिंग आणि स्नुपिंग झालेल्या नेत्यांमध्ये शरद पवार, दिग्विजय सिंग या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचाही समावेश असल्याचा आरोप होत आहे.

संबंधित बातम्या 

एकनाथ खडसेंचाही फोन टॅप झाल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ  

भाजपने फोन टॅप केले, आता समिती चौकशी करेल, चौकशी अधिकाऱ्यांची नावं गृहमंत्र्यांकडून जाहीर  

भाजपच्या काळात विरोधकांच्या फोन टॅपिंगचा आरोप, ठाकरे सरकारकडून चौकशीचे आदेश

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.