Pankaja Munde: पंकजा मुंडे नाराज नाहीत, त्या कुठेही जाणार नाहीत, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मनाचे मांडे खाणं सुरुय- गिरीश महाजन

रोहिणी खडसे आल्या, तुम्हीही राष्ट्रवादीत या, अशी थेट ऑफर राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली. मंत्री गिरीश महाजन यांनी त्यावर आपलं मत मांडलं आहे.

Pankaja Munde: पंकजा मुंडे नाराज नाहीत, त्या कुठेही जाणार नाहीत, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मनाचे मांडे खाणं सुरुय- गिरीश महाजन
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 1:00 PM

मुंबई : पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपमध्ये नाराज आहेत. इतर कुठल्या पक्षात जाऊ शकतात, अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून होत आहे. रोहिणी खडसे आल्या, तुम्हीही राष्ट्रवादीत या, अशी थेट ऑफर राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली. त्यावर आता भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आपलं मत मांडलं आहे. “पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज नाहीत. त्या कुठेही जाणार नाहीत. पण राष्ट्रवादीचे नेते आपल्या मनाचे बोल सांगत आहेत. अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि सुप्रिया सुळे यांचे मनाचे मांडे खाणं सुरु आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. “राष्ट्रवादीचे नेते जे बोलत आले ते सगळं कपोकल्पित आहे. पंकजाताईंसमोर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी ठेवलेला प्रस्ताव योग्य नाही. त्याचा पंकजाताईंवर काहीही परिणाम होणार नाही. सर्व पक्षांची राज्यात काय परिस्थिती आहे सर्वांना माहिची आहे. त्यामुळे पंकजाताई कुठलाही दुसरा निर्णय घेणार नाहीत”, असंही महाजन म्हणाले आहेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

अमोल मिटकरींची ऑफर

आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला. मात्र सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. रोहिणी खडसेंना हे लक्षात आलं. मात्र पंकजा मुंडे यांच्याही लक्षात यायला पाहिजे. आता 12 आमदारांची यादी राज्यपाल लवकर मंजूर करतील. 12 आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. त्यामुळे पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात दिसते आहे. एक प्रकारे रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत आल्या. तशाच पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावं, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

जिंकणं हे आता शिवसेनेसाठी केवळ स्वप्नच राहील. शिवसेनेची अवस्था काय झाली आहे ते आपण बघतोय. त्यांनी हातानं स्वत:हून परिस्थिती ओढून घेतली आहे. आता दौरे करून काय मिळणार आहे? स्वत:चीच मतं स्वत:च्या पेपरमध्ये छापून आणुन काय होणार?, असा सवाल गिरीश महाजन यांनी विचारला आहे. हॉकीचे जादुगार कर्नल ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण खेलदिवस म्हणून साजरा करतो. कालची मॅच भारतानं मॅच जिंकली हे खेलदिनच गिफ्ट आहे, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.