पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत; गोपीचंद पडळकरांचं उद्धव ठाकरेंना पत्र

संजय राऊत यांना आपणास पंतप्रधान म्हणून बघण्याचे वेध केव्हाच लागले आहेत आणि त्यांची मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले | Gopichand Padalkar Uddhav Thackeray

पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत; गोपीचंद पडळकरांचं उद्धव ठाकरेंना पत्र
उद्धव ठाकरे आणि गोपीचंद पडळकर
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 10:29 AM

सांगली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना नुकतेच पत्र लिहून पंतप्रधान होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंय. मात्र, राजकीय तडजोडीमुळे भविष्यात त्यांचा ‘पाकधर्जिणा’ अशी ओळख असलेल्या नेत्यांमध्ये समावेश होण्याचा धोका आहे, असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)  यांनी केले आहे. एका पत्राद्वारे आपण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय राजकारणाची नांदी दिली. याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. खासदार संजय राऊत यांना आपणास पंतप्रधान म्हणून बघण्याचे वेध केव्हाच लागले आहेत आणि त्यांची मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले, असे पडळकर यांनी म्हटले. (BJP leader Gopichand Padalkar letter to CM Uddhav Thackeray)

गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी काही प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिली नाही तर जनता काय ते समजून जाईल, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.

‘पंढरपूर’चा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा: गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

एका पत्राद्वारे आपण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय राजकारणाची नांदी दिली, या बद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन! खासदार संजय राऊत यांना आपणास पंतप्रधान म्हणून बघण्याचे वेध केंव्हाच लागले आहेत आणि त्यांची मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत आपण सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

ज्या बारा नेत्यांनी हे पत्र दिले आहे त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्याशी हयातभर लालबाग, परळपासून मराठी पट्टयात संघर्ष केला आणि मराठी माणसाला आपल्या झेंड्याखाली आणले त्या कम्युनिस्टांचे देशातील दोन बडे नेते डी.राजा आणि सीताराम येचुरी ही आहेत. आपले सर्वेसर्वा मार्गदर्शक अर्थातच शरद पवार आहेत. ज्यांची खिल्ली बाळासाहेबांनी पाकधार्जिणा म्हणून अनेकदा उडविली ते फारुख अब्दुल्लादेखील आहेत. असो , अशी नोंद इतिहासानं तुमच्याबद्दल घेऊ नये म्हणून मी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून तुमच्या असणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव तुम्हाला करवून देत आहे.

राष्ट्रीय राजकारणाकडे आपली अशी वाटचाल सुरू झालेली असताना जे मुद्दे आपण पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले आहेत त्यांच्या अनुषंगाने मी महाराष्ट्रकेंद्रित काही प्रश्न आज आपल्यासमोर उपस्थित करीत आहे.

1) दिल्लीत पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानासह जो सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प उभारला जाणार आहे,त्याचे बांधकाम तातडीने थांबविण्यात यावे आणि त्याचा पैसा ऑक्सिजन आणि कोरोना लस खरेदी करण्यासाठी व्हावा, अशी मागणी या पत्रात आपण केलेली आहे. उद्धवजी! मग मंत्रालयासमोर 900 रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला मनोरा आमदार निवास प्रकल्प थांबवून आपण तो निधी ऑक्सिजन आणि कोरोना लस खरेदीसाठी करणार आहात का? तसे केल्यास महाराष्ट्र आपले कौतुकच करेल. आधी हा प्रकल्प 600 रुपयांचा होता नंतर त्यात 100+100अशी 300 वाढ करण्यात आली, ती कशासाठी आणि कोणासाठी ? फडणवीस सरकारच्या काळात हे कंत्राट केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सरकारी कंपनीला देण्यात आले होते. आपल्या कार्यकाळात ते काढून घेण्यात आले आणि खासगी कंपनीला दिले जात आहे, हे कशासाठी आणि कोणासाठी ??

2) मोफत कोरोना लसीकरण सर्व वयोगटांसाठी देशभरात तत्काळ सुरू करा,अशी मागणी आपण या पत्रात केली आहे. उद्धवजी! आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. मुंबईसाठी 50लाख लशींची खरेदी करण्यासाठीची निविदा शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेने काढली आहे. मुंबई मनपाकडे असलेल्या 79 जार कोटींच्या बचत ठेवी वेळीच (टक्केवारी कापून ) रयतेसाठी वापरल्या असत्या तर संपूर्ण राज्याचे लसीकरण झाले नसते का? मुंबईबरोबरच राज्यातील लहानमोठी शहरे आणि ग्रामीण भागातही लसींचा तात्काळ पुरवठा केला जाईल, असे आपण जाहीर का नाही करत? आपल्याला सामनाच्या अग्रलेखातून ‘कोलमडलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला ॲाक्सिजन कोण देणार?’असा सवाल उपस्थित करणायाची वेळच आली नसती. पण किमान आपल्या मुखपत्राने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडलीये हे मान्य केलंय, यासाठी हुजूऱांचं कौतुकच.

3) पीएम केअर फंड आणि इतर अनअकाऊन्टेड फंडात (म्हणजे काय हे कळले नाही) असलेला निधी व्हॅक्सिन, ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी तत्काळ द्या, अशी मागणी आपण मोदीजींना लिहिलेल्या पत्रात केली आहे. उद्धवजी! ही मागणी करत असतानाच मुख्यमंत्री सहाय्यता निधीत असलेली सर्व रक्कम ही कोरोना लढ्यासाठी देत असल्याचे आपण जाहीर केले तर आपल्या उक्ती व कृतीत कुठलीही तफावत नाही, याचे कौतुकच राज्यातील जनतेला वाटेल.

4) गरजूंना मोफत अन्नधान्य द्या आणि बेरोजगारांना सहा हजार रुपये महिना द्या, अशी मागणी आपण मोदीजींकडे रेटलेली आहे. त्या सोबतच आपण महिनाभरापूर्वी जाहीर केलेल्या साडेपाच हजार कोटी रुपयांपैकी किती रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात पडली याचा हिशेब व यादी देणार का? पुरवठादारांचं भलं करण्यासाठी आदिवासींना पैशांऐवजी खाद्यवस्तू पुरवण्याचे कंत्राट आपण रद्द करणार आहात का?

5) शेतकरी कायदे रद्द करा आणि तसे केल्यास शेतकरी हे भारतीयाच्या अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी कार्यरत होतील, असे आपण मोदीजींना लिहिलेल्या पत्रात म्हटलेले आहे. उद्धवजी! म्हणजे काय बा? खरेच नाही समजलो. शेतकरी कायदे रद्द करण्याचा आणि शेतकऱ्यांनी अन्न पिकविण्याशी काय संबंध आहे?

उद्धवजी! आपल्यासह बारा नेत्यांनी मोदीजींना लिहिलेले पत्र वाचल्यानंतर महाराष्ट्रासंदर्भात मी हे सवाल केलेले आहेत. आपण उत्तर दिले तर ठीकच, समजा नाही दिले तरी जे समजायचे ते राज्यातील जनता समजूनच जाईल.

(BJP leader Gopichand Padalkar letter to CM Uddhav Thackeray)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.