सातारा : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना कराडमध्ये पोलिसांनी उतरवलं होतं. तिथेच आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप करत हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळआ बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.
सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने (Mahalaxmi Express) कोल्हापूरला (Kolhapur) निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. आता सोमय्या त्याच कराड शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत आहेत.
हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी 127 कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केला. तसंच मला हे घोटाळे उघड करण्यास देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सांगितलंय, असंही किरीट सोमय्या म्हणाले.
“मी उदाहरण देतो. २०२० मध्ये कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिडींग न होता, हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा लि या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायाचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत ७१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे.”
“आमची मागणी आहे, की या घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी. पुन्हा एकदा आपण भेटणार इथे किंवा कोल्हापूरला. हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार”
“मूळ विषय आहे की हसन मुश्रीफ साहेब 127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँडरिंगचे आले त्याचा हिशेब अजून का दिला नाही. शरद पवार साहेब ही तुमची व्यूवरचना आहे का.. मला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय, बाकीचे विषय आम्ही बघतो, तुम्ही मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अधिकाऱ्यांवरील गदांबाबत आम्ही बघतो.”
“मी पुन्हा सांगतो, सरसेनापती घोरपडे कारखान्यात ९८ कोटी रुपये हे बोगस कंपन्याद्वारे भ्रष्टाचाराद्वारे आणले. मुश्रीफ परिवारातर्फे २ कोटी आहे, बाकी सगळा पैसा बोगस कंपन्याद्वारे आहे.”
“मुश्रीफांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, आपला आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना याचा संबंध काय? हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा. मुश्रीफ परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला. यामध्येही शेल कंपन्यांद्वारे पैसे उभारले. बोगस अकाऊंट उघडून कॅश टाकायचे आणि पैसे घ्यायचे, १०० कोटी रुपये घेतले.”
गडहिंगल्ज कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार, असंही सोमय्या यांनी सांगितलं
“ठाकरे सरकारची ठोकशाही आहे. गणेश विसर्जनापासून रोखलं, अंबाबाईच्या दर्शनापासून रोखलं, csmt स्टेशनबाहेर मला रोखलं, ट्रेन मिळणार नाही हे पाहिलं, धक्काबुक्की केली. मी विचारलं कोणत्या अधिकाराअंतर्गत रोखताय, त्यावर त्यांनी मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांबाहेर जाण्यापासून रोखण्याचा आदेश उद्धव ठाकरे सरकारने दिला असं सांगितलं. आमच्या वैयक्तिक हक्कांवर गदा का? याचं उत्तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिलं पाहिजे, असं किरीट सोमय्या म्हणाले.”
“जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे रोखण्याचा मला ठाकरे सरकारने प्रयत्न केला. मी आदेशाची कॉपी मागितली, त्यात लिहिलं होतं, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलाय सोमय्यांना मुंबई बाहेर जाऊ देऊ नये. त्यावर मी आक्षेप घेतला, त्यावर पोलीस पळून गेले.”
“माझी मागणी गृहमंत्री वळसेपाटीलांकडे ज्या पोलिसांनी गैर कायदेशीरपद्धतीने ऑर्डर दाखवली, कोल्हापूर पोलिसांची ऑर्डर, कराड पोलिसांनी दिली, या ऑर्डरमध्ये किरीट सोमय्यांना मुंबईतून बाहेर पडू देऊ नका असं कुठेच नाही. मग मुख्यमंत्री आणि गृहमंत्री खोट्या ऑर्डरची जबाबदारी स्वीकारणार का? आमच्या वैयक्तिक हक्कांवर गदा का?”
उद्धव ठाकरेंनी हिरवा रंग धारण करावा
आम्ही हिंदू म्हणून रोखता? उद्धवजी तुम्ही हिरवा रंग धारण करा, मला विसर्जनापासून, आंबेबाईच्या दर्शनापासून रोखता, उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा चालणार नाही. आम्ही हायकोर्टात जाणार, चुकीच्या आदेश देणाऱ्या मुंबई पोलिसांवर कारवाई व्हावी, मुंबई पोलिस कमिशनरवर कारवाई व्हावी.
“ऑर्डरमध्ये नेमकं काय म्हटलं, तर माननीय हसन मुश्रीफ हे कागलमध्ये येणार आहेत, त्यांच्या स्वागतासाठी जनसमुदाय दाखल होणार आहे, त्यावेळी किरीट सोमय्या गनिमी काव्याने धोका निर्माण करण्याची धारणा निर्माण आहे. माझी वळसे पाटलांकडे मागणी आहे, ही अधिकृत ऑर्डर तुमच्या सरकारने काढली आहे, तर ही गुपीत माहिती कुठून दिली?”
“ठाकरे सरकारने माजी सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने मला संरक्षण दिलं, त्याच्याशीही तुमची गद्दारी. तुमच्याकडे जी माहिती आली गनिमी काव्याने किरीट सोमय्यांवर हल्ला होऊ शकतो, ही माहिती तुम्ही सुरक्षा यंत्रणांशी का शेअर केली नाही?”
“उद्धव ठाकरेंची इच्छा आहे किरीट सोमय्ायंवर हल्ला व्हावा, याचं उत्तर दिलीप वळसे पाटील यांना द्वावं लागेल. हसन मुश्रीफ यांच्या स्वागताला ncp चे कार्यकर्ते येणार होते की गुंड? की राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच गुंड आहेत का?”
गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार, 27 तारखेला उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्यांचा घोटाळ्यांची पाहणी करणार
मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे, तिथेही असाच घोटाळा आहे. पुढच्या सोमवारी 27 तारखेला मा. उद्धव ठाकरे साहेबांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे
३० तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला, त्याची पाहणी करणार. मला रोखणार आहे का?, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
मुंबई पोलिसांना मी लिगली विचारलं, त्यामुळे पोलीस पळून गेलं. ठाण्याला पोलीस म्हणाले खाली उतरा, मी म्हटलं आदेश दाखवा. शेवटी साताऱ्यात सीनियर पोलीस आले, डब्यात बसले, त्यांनी मला विनंती केली, कराडमध्ये उतरा. मी त्यांना विचारलं आदेश दाखवा, त्यांनी मला आदेश दाखवला, माझी सही घेतली.
त्यांनी सांगितलं मी म्हटलं विनंती नाही, मी कोल्हापूरला जातो, बॉर्डरवर थांबवा. ते म्हणाले इथे सगळी व्यवस्था केली आहे, माझं भांडण यांच्याशी नाही. मी कायदा सुव्यवस्थेचं पालन करायला तयार होतो, पण त्यांनी खोटी ऑर्डर दाखवली. पोलिसांनी मला कराडमध्ये व्यवस्था असल्याचं सांगितलं त्यामुळे मी इथे उतरलो, असं सोमय्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांची दडपशाही, आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने सगळं होतंय
“हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या दडपशाहीमुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने होत आहे, आमचं चॅलेंज त्यांना आहे. माझी पहिली हरकत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आहे. पहिली जबाबदारी गृहमंत्री वळसे पाटील यांची आहे.”
“ठाकरे सरकार कितीवेळा दडपशाही करणार? हसन मुश्रीफांच्या घोटाळ्याविरोधात कागल पोलीस स्टेशनमध्ये जात होतो. सरसेनापती कारखाना त्या हद्दीत येतो. मी तक्रार केल्यानंतर ७ दिवसात कोर्टात जाऊ शकतो. मी अंबाबाईचं दर्शन घेणार हे तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. अंबाबाईचं दर्शन बाहेरुन करणार होतो.”, असंही सोमय्या म्हणाले.
मी माझ्या वकिलाशी बोललो, हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आपल्याला कायदेशीर अॅक्शन सुरु करायची आहे. म्हणून कागल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी लागणार आहे. मी पुन्हा एकदा कोल्हापूर प्रशासनाला माझा दौरा कळवणार, जेव्हा त्यांना वाटेल ncp कडून धोका आहे, त्याची माहिती झेड कॅटेगरीच्या सोमय्यांच्या सुरक्षा यंत्रणेला देतील, मी फार दिवस थांबणार नाही.
माझ्याविरुद्ध अब्रुनुकसानीच्या ६ नोटीसच्या धमक्या आल्या आहेत. प्रताप सरनाईक, अनिल परब, जितेंद्र आव्हाडचे वाझे, हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे मुलुंड पोलिसात दादागिरी करुन त्यांच्या एका केसमध्ये माझा मुलगा नील सोमय्या साक्षी म्हणून हवा होता. मला फोन करुन विनंती केली, त्यांची केस अधिक मजबूत होईल. ठाकरे सरकारने अफवा पसरवली नील सोमय्या विरुद्ध चौकशी सुरु झाली.
प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली, प्रो. मेधा सोमय्या यांनी काही घोटाळा केल्याचा आरोप केला. मात्र उद्धव ठाकरे यांना सवय आहे धमक्या देण्याची मात्र मी धमक्यांना घाबरणार नाही.