भांडूपचा देवानंद महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत कसा पोहोचला? भाजपा नेत्याची जीभ घसरली

"राऊतने मंगळसूत्रावर बोलू नये. तुझ्या सारखा शक्ती कपूर घरात घेण्याची लायकी नाही. मातोश्री खंडणी खोरांचा अड्डा झालाय. मातोश्री खंडणी खोर भवन अस नाव देऊन टाका" विरोधी पक्षावर टीका करताना भाजपा नेत्याची जीभ घसरली 'मोदींवर आरोप करणाऱ्या भांडूपच्या देवानंदने आपला इतिहास पहावा' असं सुद्धा म्हटलय.

भांडूपचा देवानंद महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत कसा पोहोचला? भाजपा नेत्याची जीभ घसरली
bjp
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 12:58 PM

“कर्नाटकमध्ये मोदी साहेबांनी काँग्रेसच्या जाहिरनाम्याची सत्य परिस्थिती मांडली. काँग्रेसचे लोक महिलांच्या मंगळसूत्रावर पोहोचतील, अशी परिस्थिती आहे. मोदींवर आरोप करणाऱ्या भांडूपच्या देवानंदने आपला इतिहास पहावा. अन्यथा स्वप्ना पाटकर यांच्या माध्यमातून हा महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत कसा पोहोचला हे जाहीर करावं लागेल” असं नितेश राणे म्हणाले. विरोधकांवर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली. “अनेक प्रकरणात याचे हात बरबटलेले आहेत. तेव्हा त्यांच्या प्रकरणात याला मंगळसूत्र दिसले नाही का? तू मंगळसूत्रावर कसा पोहोचतोस याची वेब सिरीज काढावी लागेल” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

“नंदकिशोर चतुर्वेदी व श्रीधर पाटकर यांच्या प्रॉपर्टीवर धाड पडली. आमच्या नेत्यांवर जी टीका सूरु आहे. ती देशभक्ती म्हणून नाही तर मेहुणा जेलमध्ये जाईल या भीतीने” अशी टीका नितेश राणे यांनी केली. “तुमच्या तोंडावर पसरलेली थुंकी पुसा आणि मग आमच्या नेत्यांवर बोला” असं नितेश राणे म्हणाले. राऊतने मंगळसूत्रावर बोलू नये. तुझ्या सारखा शक्ती कपूर घरात घेण्याची लायकी नाही” असं नितेश राणे म्हणाले.

‘लिकर प्रकरणात तू सुद्धा आहेस’

“जो माणूस जाहीर पध्दतीने एका महिलेला घाणेरड्या शिव्या घालतो. तिच्या घराबाहेर हेर नेमतो, धमक्या देतो त्या माणसाने आम्हाला सल्ले देऊ नये. तू तुझ्या घरातील महिलांबाबत कसा विचार करतो यावरून समजतं” असं नितेश राणे म्हणाले. “केजरीवालबाबत याने बोलू नये. जसा केजरीवाल आत गेलाय, तसा तू सुद्धा आत जाणार लिकर प्रकरणात तू सुद्धा आहेस” असा आरोप नितेश राणे यांनी केला.

‘मातोश्री खंडणी खोर भवन’

“मातोश्री खंडणी खोरांचा अड्डा झालाय. मातोश्री खंडणी खोर भवन अस नाव देऊन टाका” अशी टीका नितेश राणे यांनी केली. “श्रीधर पाटणकर सुद्धा सोडण्याच्या तयारीत आहे. मिलिंद नार्वेकर झाकी है. पाटणकर अभी बाकी है. सगळे सोडून जात आहेत. यामुळे उद्धव ठाकरे कसा आहे ते समजते?” असं नितेश राणे म्हणाले.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.