“सध्या राज्यामध्ये जे चाललं आहे, त्यावर त्यांची भूमिका काय?. त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे. त्यांची आरक्षणाच्या बाबतीत भूमिका काय? हे त्यांनी मांडलं पाहिजे. शरद पवार हे राज्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत. त्यांच्या भूमिका काय असणार? याची महाराष्ट्राला उत्सुक्ता आहे” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मनोज जरांगे पाटील आता सत्ताधारी आणि विरोधक दोघांवर टीका करतायत. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, “असंख्य कॅमेरे आहेत. लोक विचार मांडायला तयार आहेत. खमंग बातमी दाखवता. मुद्दा काय हा माझा मुद्दा आहे. मुद्दा आहे तिथे मी बोलणार, पण प्रत्येक गोष्टीवर नाही बोलणार” असं पंकजा मुडे म्हणाल्या.
मनोज जरांगे पाटील बोलतात 288 पाडा किंवा 288 उभे करायचे, ते राजकारणाकडे वळले, त्याकडे तुम्ही कसं पाहता? “मी काही बघत नाही. जो पर्यंत कोणी पण व्यक्ती, ते एकटचे नाहीत जे बोलतायत ते करत नसेल, तर बोलण्याला अर्थ नाही” “मोठी घोषणा करेन, दंड थोपटून बोलीन, पण जे बोलते ते केलं पाहिजे. कोणीपण बोलो प्रत्यक्षात काय करतात याची उत्सुक्ता आहे” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
‘मी ऐतिहासिक काम केली’
आमदार झाल्यावर स्वागत करु नका असं तुम्ही म्हणालात, त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, “जेव्हा शक्ती होती, सत्ता होती, तेव्हा मी ऐतिहासिक काम करु शकली हे माझं भाग्य आहे. 100 टक्के बीड जिल्हा माझी मातृभूमी, कर्मभूमी आहे. महाराष्ट्राल लोक माझ्यावर कमी प्रेम करत नाहीत. विधान परिषद सदस्य राज्याचा प्रतिनिधी असतो. राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका घ्यायला अजिबात कचरणार नाही. वंचितांना समोर ठेऊन काम करेन. माझ्यावर अंत्योदयाचे संस्कार आहेत”