कारखान्याला फुकट पैसा आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी पवारांवर प्रेम दाखवावं लागतं’, निलेश राणेंचा जयंत पाटलांना टोला
एका महिलेनं उभा केलेल्या मतदारसंघात निवडून येण यात कसला पुरुषार्थ? असा सवाल जयंत पाटील यांनी केला होता. त्यावर आता निलेश राणे यांनी जयंत पाटलांवर सडकून टीका केली आहे.
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी जयंत पाटलांवर जोरदार पलटवार केलाय. एका महिलेनं उभा केलेल्या मतदारसंघात निवडून येण यात कसला पुरुषार्थ? असा सवाल जयंत पाटील यांनी केला होता. त्यावर आता निलेश राणे यांनी जयंत पाटलांवर सडकून टीका केली आहे.(BJP leader Nilesh Rane criticizes NCP leader Jayant Patil)
“पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत आहेत. आम्हाला जयंत पाटील यांची अडचण माहित आहे. साखर कारखान्यांना फुकट पैसे मिळवण्यासाठी आणि सहकार क्षेत्रात केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी पवारांवर प्रेम दाखवावं लागतं”, अशा शब्दात निलेश राणे यांनी जयंत पाटलांवर टीकास्त्र डागलं आहे.
पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांतदादा पाटील साहेबांवर टीका करतायत. आम्हाला जयंत पाटीलांची अडचण माहीत आहे, साखर कारखान्यांना फुकट पैसे मिळवण्यासाठी आणि सहकार शेत्रात केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी पवारांवर प्रेम दाखवावं लागतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 15, 2021
जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत स्वत:चा जिल्हा सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवली. चंद्रकांतदादांनी स्वत:चं बघावं. शरद पवार यांची मापं काढू नयेत, असा सल्लाच जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे. रविवारी शरद पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांवर खोचक टीका केली. त्यावर आता जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांवर निशाणा साधला आहे.
शरद पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली!
‘ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू’, अशा शब्दात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता. महत्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं, असंही पवार म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही पवारांवर खोचक टीका केली. ‘माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये’, अशा शब्दात चंद्रकांतदादांनी पवारांना टोला हाणला.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलू, पवारांचे चंद्रकांतदादांना चिमटे, उत्तर फडणवीसांकडून
शरद पवारांवर टीका करण्याशिवाय पर्याय नाहीच; चंद्रकांत पाटलांची कबुली, म्हणाले….
BJP leader Nilesh Rane criticizes NCP leader Jayant Patil