कोकणात मोठा ट्विस्ट, निलेश राणे कुडाळमधून धनुष्याबाण चिन्हावर लढणार? नेमकं काय घडतंय?

भाजप नेते निलेश राणे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. पण महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप नेते नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

कोकणात मोठा ट्विस्ट, निलेश राणे कुडाळमधून धनुष्याबाण चिन्हावर लढणार? नेमकं काय घडतंय?
भाजप नेते निलेश राणे
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 7:07 PM

राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. भाजप नेते नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जावून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांच्यात यावेळी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या मतदारसंघातून माजी खासदार निलेश राणे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे नारायण राणे यांनी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता निलेश राणे कुडाळमधूल लढतील तर धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवतील का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नारायण राणे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्री उदय सामंत यांना वर्षा निवासस्थानी बोलावलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यामध्येदेखील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काही मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये आदलाबदल करण्यात आली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही तसं केलं जाण्याची शक्यता आहे. पण विधानसभा मतदारसंघाची अदलाबदल होणार की, दुसरी काही रणनीती आखली जाईल ते आगामी काळात स्पष्ट होईल. दरम्यान, निलेश राणे यांच्याबाबतच्या चर्चा सुरु झाल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निलेश राणे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढतील?

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता निलेश राणे कुडाळमधून धनुष्याबाण चिन्हावर निलडणूक लढणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राणे कुडाळमधून भाजप की शिवसेनेकडून लढणार याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे. कुडाळची जागा महायुतीत जागावाटपात शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जागा निलेश राणे यांच्यासाठी शिवसेनेने भाजपसाठी सोडावी, अशी विनंती नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याची शक्यता आहे. पण महायुतीत प्रत्येक जागेला महत्त्व आहे. त्यामुळे शिंदेची शिवसेना भाजपसाठी ती जागा सोडते की निलेश राणे यांना धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढावी लागते? ते आगामी काळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान, कुडाळमध्ये सध्या ठाकरे गटाचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातून निलेश राणे उमेदवारी लढवतील तर त्यांचा सामना हा ठाकरे गटाचे वैभव नाईक यांच्याविरोधात होईल.

उदय सामंत काय म्हणाले?

दरम्यान, शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी निलेश राणे यांच्या कुडाळमधील उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “निलेश राणे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत. विधानसभेला ते उभे राहणार आहेत, एवढचं मला माहीत आहे. पण निलेश राणे यांनी जर निर्णय घेतला तर आमची कोकणातील शिवसेनेची ताकद पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असेल. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल”, अशी सूचक प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

छगन भुजबळांच्या जीवाला धोका, पुन्हा धमकी; मेसेज-फोनमध्ये काय म्हटलंय?
छगन भुजबळांच्या जीवाला धोका, पुन्हा धमकी; मेसेज-फोनमध्ये काय म्हटलंय?.
शिवनेरी सुंदरीवरून रोहित पवार भडकले; एसटीच्या नव्या अध्यक्षांवर निशाणा
शिवनेरी सुंदरीवरून रोहित पवार भडकले; एसटीच्या नव्या अध्यक्षांवर निशाणा.
हसन मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल, 'खलनायकाला लाजवेल असं...'
हसन मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल, 'खलनायकाला लाजवेल असं...'.
नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, ‘वर्षा’वर खलबतं, काय झाली चर्चा
नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, ‘वर्षा’वर खलबतं, काय झाली चर्चा.
रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल, असं विशाल पाटीलचं काम...,कोणाची टीका?
रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल, असं विशाल पाटीलचं काम...,कोणाची टीका?.
'कहो दिल से धनुभाऊ फिरसे', समर्थकांचा स्वॅगच न्यारा, प्रचारास सुरूवात
'कहो दिल से धनुभाऊ फिरसे', समर्थकांचा स्वॅगच न्यारा, प्रचारास सुरूवात.
अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र; म्हणाले, निराशेला गाडून...
अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र; म्हणाले, निराशेला गाडून....
माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी.., दादांच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी.., दादांच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य.
'आमदारकी गेली तरी चालेल पण...', शिवसेनेतील आमदाराच्या वक्तव्याची चर्चा
'आमदारकी गेली तरी चालेल पण...', शिवसेनेतील आमदाराच्या वक्तव्याची चर्चा.
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, आजच ताडोबाच्या जंगल सफारीचं प्लानिंग करा
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, आजच ताडोबाच्या जंगल सफारीचं प्लानिंग करा.