धनुष्यबाण चिन्ह गेलं तर उद्धव ठाकरेंच्या ‘प्लॅन बी’ बाबत निलेश राणे काय म्हणतात?
भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे बोगस माणूस आहे. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना रसातळाला नेली, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
मुंबई : भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेना (Shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे बोगस माणूस आहे. त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना रसातळाला नेली. आता उरलीसुरली शिवसेना देखील उद्धव ठाकरे वाचवू शकणार नाहीत, असा घणाघात निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.धनुष्यबाण चिन्ह गेलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे कुठलाही ‘प्लॅन बी’ नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे हे आता राहिलेली शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र धनुष्यबाण चिन्ह गेलं तर यातील किती आमदार त्यांच्यासोबत राहातील याबाबत शंका असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. राणेंच्या या टीकेला शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आमदार वाचवण्यासाठी धडपड
‘उद्धव ठाकरेंची सेना आता रसातळाला जाणार त्यांना आता कोणी वाचू शकत नाही. त्याचं भविष्य ठरलेलं आहे. ते उद्धस्त होणार, आज बाळासाहेबांचा पक्ष 15 आमदारांचा पक्ष करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आता ते 15 आमदाराही राहातील की नाही याबाबत शंका आहे. उद्धव ठाकरेंकडे कोणताही मास्टर प्लॅन नाही, उद्धव ठाकरे हे बोगस माणूस आहेत, सध्या शिवसेनेमध्ये जे आमदार आहेत ते वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
गुलाबराव पाटलांचाही टोला
तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. धनुष्यबाण चिन्ह गेल्यास उद्धव ठाकरे यांना पाच आमदारांचा पाठिंबा देखील राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.