मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरचा कोकण दौरा म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळं कसं छान सुंदर आहे हे दाखवलं जातं आणि तोंड धुतल्यावर सगळं निघून जाते, तसा हा प्रकार असल्याची टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा कोकणातील वस्तुस्थिती सरकारपुढे मांडण्यासाठी होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने काहीही साध्य होणार नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले. (BJP leader Nitesh Rane slams CM Uddhav Thackeray)
ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सर्व कारभार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्यावा. मग आम्ही किती मदत आणून दाखवतो, ते बघा. एवढी हिंमत तुमच्यात आहे का? मनगटात हिम्मत असावी लागते. नुसता टोप (केसांचा) घालून कुणी हिरो होत नाही (उदय सामंत यांना टोला). सरकारमध्ये वजन लागते. तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, मदत आणून दाखवा, असे नितेश राणे यांनी म्हटले.
गेल्या निसर्ग चक्रीवादळ तुलनेत प्रचंड नुकसान सिंधुदुर्गाचे झालेलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडून अपेक्षा कशा ठेवणार ? मागचा अनुभव फार वाईट आहे. निसर्ग चक्रवादळाचे पैसे मिळाले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काल मी माहिती घेतली 8 कोटी पैकीं फक्त 49 लाख मिळाले. आज मुख्यमंत्री पंचनामे करण्याचे आदेश देतात मग ते पंचनामे रद्दी भरण्यासाठी ठेवले आहेत का ? अधिकारी पर्यटनासाठी गावागावात फिरतात का ? मुख्यमंत्री उद्या कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
या मुख्यमंत्र्यांकडून आमच्या जास्त अपेक्षा नाहीत. निसर्ग चक्रीवादळाचे पैसे मिळाले नाहीत तर आता काय देणार ते ? उद्याचा त्यांचा दौरा फोटोसेशनसाठी आहे. फोटोग्राफरने फोटो काढायचे असतात, स्वतःचे फोटो काढून घ्यायचे नसतात…जर ते फोटो काढून घेण्यासाठी येत असतील ते काम त्यांनी घरी बसूनच करावे…इथे यायची गरज काय ? इथे येतच असाल तर राज्याच्या जनतेच्या दिलसासाठी पॅकेज जाहीर करतात..निसर्ग चक्तीवादळाची, तौक्ते चक्रीवादळाची मदत द्या.
आमचं केंद्रात सरकार आहे. आम्ही सर्व महिती सरकारला दिली आहे. आमचे मुख्यमंत्री कमी पडले असले तरी नरेंद्र मोदी साहेबांकडून भरपूर मदत मिळेल याचा विश्वास असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही; मनसेचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत, हे आता मोदींनाही पटलं असावं: संजय राऊत
(BJP leader Nitesh Rane slams CM Uddhav Thackeray)