नागपूर : सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात आगामी महापालिका निवडणुकांची चर्चा आहे. अश्यात सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत. नागपूर महापालिकेची देखील निवडणूक होतेय. अश्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय. “आगामी नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये (Nagpur Municipal election) चेहरा पाहून उमेदवारी मिळणार नाही. कुणाचीही-कुठलीही लॉबिंग चालणार नाही. निवडून येण्याची क्षमता असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल”, असं नितीन गडकरी म्हणालेत. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. जरीपटका इथल्या महात्मा गांधी शाळेच्या प्रांगणात भाजपच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठक पार पडली तेव्हा त्यांनी आपलं मत मांडलं. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, अनिल सोले, अशोक मानकर, डॉ. मिलिंद माने संजय भेंडे, डॉ. उपेंद्र कोठेकर, रमेश मंत्री, संदीप जोशी आणि इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
राजकीय वर्तुळात सध्या आगामी महापालिका निवडणुकांची चर्चा आहे. अश्यात सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत. नागपूर महापालिकेची देखील निवडणूक होतेय. अश्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय. “आगामी नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये चेहरा पाहून उमेदवारी मिळणार नाही. कुणाचीही-कुठलीही लॉबिंग चालणार नाही. निवडून येण्याची क्षमता असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल”, असं नितीन गडकरी म्हणालेत.
जरीपटका इथल्या महात्मा गांधी शाळेच्या प्रांगणात भाजपच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठक पार पडली तेव्हा गडकरींनी आपलं मत मांडलं. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, अनिल सोले, अशोक मानकर, डॉ. मिलिंद माने संजय भेंडे, डॉ. उपेंद्र कोठेकर, रमेश मंत्री, संदीप जोशी आणि इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
नागपूर महापालिकेत एकूण 156 जागा आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी 31, अनुसूचित जमातीसाठी 12 आणि महिलांसाठी 56 जागा राखीव आहेत. महापालिकेत एकूण 52 प्रभाग आहेत. नागपूरची लोकसंख्या 2447494 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 480759 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 188444 एवढी आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. बी. राधाकृष्णन हे महापालिकेचे आयुक्त आहेत.