Belgaum Bypoll: ‘गडकरीजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नका’

| Updated on: Apr 15, 2021 | 10:26 AM

मराठी माणसाची एकजूट इथे आहे त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करून नका. जर मदत करता येत नसेल तर निदान तोडफोड तरी करू नका | Nitin Gadkari Sanjay Raut

Belgaum Bypoll: गडकरीजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नका
नितीन गडकरी आणि संजय राऊत
Follow us on

बेळगाव: नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. ते केवळ विदर्भाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये, असे संजय राऊत यांनी सांगितले. (Is bjp nitin gadkari taking rally in belgaum bypoll to defeat marathi manoos asks sanjay raut)

ते गुरुवारी बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपने इथे ताकद लावली वा काँग्रेसने इथे ताकद लावली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ते राष्ट्रीय पक्ष आहेत. पण महाराष्ट्रातील नेत्यांनी मग कोणत्याही पक्षाचे असोत, इथे येऊन मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नये. कोणीही असतील, मग ते काँग्रेसचे असतील किंवा भाजपचे. राष्ट्रवादी किंवा शिवसेना इथे मराठी माणसाच्या विरोधात प्रचार करणे शक्यच नाही. इतकंच कशाला काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते इथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करतील असं मला वाटत नाही. कारण सीमा प्रश्न आणि इथल्या मराठी माणसाशी आपण एका भावनेनं बांधले गेले आहोत. पण भाजपचे लोक आहेत त्यांचा या चळवळीशी तसा संबंध नाही. भावनिक गुंतवणूक नाही. पण मराठी म्हणून तरी इथल्या बांधवांच्या विरोधात जाण्याचे पाप तुम्ही करू नका, असे संजय राऊत यांनी म्हटले.

‘सीमावासियांना मदत करता येत नसेल तर निदान तोडफोड करु नका’

नितीन गडकरी यांचा बेळगावात प्रचारासाठी येण्यामागचा उद्देश समजून घेतला पाहिजे. गडकरी मोठे नेते आहेत. ते फक्त विदर्भाचे नेते नाहीत. ते महाराष्ट्राचेही नेते. महाराष्ट्रात सीमा भाग यावा, असे ठराव गडकरी मंत्री असतानाही झाले आहेत हे त्यांनी विसरू नये. आजही प्रत्येक विधानसभा अधिवेशनात सीमा भाग महाराष्ट्रात यावा हा ठराव करीत असतो. माझं सर्व नेत्यांना आवाहन आहे की, मराठी माणसाची एकजूट इथे आहे त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करून नका. जर मदत करता येत नसेल तर निदान तोडफोड तरी करू नका, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’, संजय राऊतांचा कन्नडिगांना थेट इशारा

Special Report | बेळगाव पोटनिवडणूक, वर्षोंवर्षांपासून कानड्यांचा अत्याचार, महाराष्ट्रात सामील होण्यासाठी चाचपडणाऱ्या शेकडो गावांची कहाणी

बेळगाव प्रशासनाला संजय राऊतांची धास्ती, स्टेज, साऊंड सिस्टिमची मोडतोड! राऊतांचा कडक शब्दात इशारा

(Is bjp nitin gadkari taking rally in belgaum bypoll to defeat marathi manoos asks sanjay raut)