OBC | ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत जाहीर निवडणुकांना स्थगिती द्यावी, पंकजा मुंडेंची राज्य सरकारला विनंती

ओबीसींच्या प्रश्नावर लढणारा कार्यकर्ता म्हणून मी विनंती करते की, निवडणूक आयोगाशी चर्चा करून, या निवडणुकांना स्थगिती द्यावी, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

OBC | ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत जाहीर निवडणुकांना स्थगिती द्यावी, पंकजा मुंडेंची राज्य सरकारला विनंती
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 3:49 PM

मुंबईः ओबीसी आरक्षणासंदर्भातील (OBC Reservation) सुनावणी आज सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारच्या प्रयत्नांमुळे ओबीसी आरक्षण मिळेल, असा विश्वास आहे. मात्र आरक्षण मिळेपर्यंत सध्या जाहीर झालेल्या निवडणुकांना स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयी बोलणं झालं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मी विनंती करेन. राज्य निवडणूक आयोगाकडे सदर विषयावर बोलून राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांना तोपर्यंत स्थिगिती द्यावी. तरच हा ओबीसींसाठीचा न्याय असेल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.  मुंबईत पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंकजा मुंडेंच्या या विनंतीवर राज्य सरकार काय भूमिका घेते, हे पहावं लागेल.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या. ‘ सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. तारीख पुढे ढकलली आहे. ज्या निवडणुका जाहीर झाल्यात, त्या घेणं क्रमप्राप्त आहे, असं कोर्टानं म्हटलं आहे. ओबीसींच्या प्रश्नावर लढणारा कार्यकर्ता म्हणून मी विनंती करते की, निवडणूक आयोगाशी चर्चा करून, या निवडणुकांना स्थगिती द्यावी. 92 ठिकाणी निवडणुका होणार आहेत. या झाल्यानंतर उरलेल्या निवडणुकांना आरक्षण देणं हा अन्याय आहे. ओबीसी आरक्षण मिळणं हा आत्मविश्वास लोकांच्या मनात आहे. ओबीसी आरक्षण सर्वांना नियम मिळेल. निवडणूक आयोगाशी चर्चा केली पाहिजे. त्यांनी निवडणुकांना तत्काळ स्थगिती दिली पाहिजे. हीच आग्रहाची भूमिका आहे. मी देवेंद्र फडणवीसांशी बोलले आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

राष्ट्रवादीची भूमिका बदलली…

महाविकास आघाडीत असताना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची तयारी होती. मात्र सरकार बदललं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पटील यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, सत्तेत असल्यावर भूमिका बदलणं हे चुकीचं आहे. महाराष्ट्रासाठी हे हितकारक नाही. ओबीसींचं हित हा केंद्रबिंदू असला पाहिजे. कोर्ट हे सुप्रीम पातळीवर आहे. पण यातून मार्ग काढण्याचं काम सरकारचं आहे. आता जाहीर झालेल्या निवडणुका आरक्षण मिळेपर्यंत स्थगित कराव्यात, यासाठी सरकारने प्रयत्न करणं गरजेचं आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.