Pankaja Munde Holi Wishes | रंगपंचमी धिंगाणा-मस्तीने सुरु होते, झोपेतून उठवत रंग लावतात, पण.. : पंकजा

आपलं जीवन लवकर पूर्ववत आणि तसंच रंगीत व्हावं, अशा शुभेच्छा पंकजांनी दिल्या. (BJP Leader Pankaja Munde Holi Dhuliwandan Wishes)

Pankaja Munde Holi Wishes | रंगपंचमी धिंगाणा-मस्तीने सुरु होते, झोपेतून उठवत रंग लावतात, पण.. : पंकजा
पंकजा मुंडेंकडून रंगपंचमीच्या शुभेच्छा
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 1:08 PM

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक रंगांनी आपलं जीवन पूर्णपणे भरुन जावं, अशा शुभेच्छा पंकजांनी व्यक्त केल्या. रंगपंचमीची सकाळ ही आरडाओरडा, धिंगाणा, मस्तीने सुरु होते. कोणीतरी झोपेतून उठवून रंग लावतं, अशा आठवणी पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितल्या. (BJP Leader Pankaja Munde Holi Dhuliwandan Wishes)

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

“हॅपी होली, आज रंगपंचमी, खरं तर रंगपंचमीची सकाळ ही आरडाओरडा, धिंगाणा, मस्तीने सुरुवात होते. कोणीतरी येतं, झोपेतून उठवतं, रंग लावतं, मस्ती असते. आणि या सगळ्या गोष्टींची अनेक वर्ष सवय झाल्यानंतर आज अत्यंत शांतपणे आपण ही होळी आणि रंगपंचमी साजरी केली आहे.” अशी आठवण पंकजांनी सांगितली.

“रंगपंचमीच्या दिवशी अनेक रंगांनी आपलं जीवन पूर्णपणे भरुन जावं, अशा शुभेच्छा देते. मागच्या रंगपंचमीपासून आतापर्यंत कोरोनाने प्रत्येक रंगाची जागा घेतली आहे. ती पुढच्या काळात लवकरच निघून जावी, आणि आपलं जीवन पूर्ववत, तसंच रंगीत व्हावं, ही शुभेच्छा पंकजांनी दिली.

“कोरोनाच्या काळात शिस्तीने सर्व सण साजरे केले. रंगपंचमीच्या निमित्तानेही कोरोनाचे सर्व नियम पाळले असतील, असा मला विश्वास आहे. आपल्या सर्वांना अत्यंत आरोग्यदायी आणि सुखी समाधानी असं वर्ष आपल्याला मिळो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते.” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

“होळीच्या अग्नीमध्ये जीवनातील सगळे दुःख विलीन होवो आणि तशीच अग्नीसारखी ऊर्जा आपल्याला मिळो आणि रंगपंचमीच्या निमित्ताने अनेक रंगांनी आपलं जीवन फुलून जावं अशा शुभेच्छा पंकजांनी व्यक्त केल्या.

राज्यभरात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना होळी साध्या पद्धतीने, केवळ घरी साजरी करा, असं आवाहन सरकारने केलं आहे. विशेषतः अनेक राजकीय नेत्यांनी धुळवडीच्या कार्यक्रमांना जाणं टाळलं. मात्र अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मेळघाटातील आदिवासींसोबत होळीचा मनसोक्त आनंद लुटला. नवनीत राणा यांनी मेळघाटातील आदिवासी महिलांसोबत कोरकू हे आदिवासी नृत्य करत आनंद व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

VIDEO | मेळघाटात खासदार नवनीत राणा यांचा कोरकू नृत्यावर ठेका

अजित पवार कोणत्या राजकीय बुद्धीने काम करतायत कळत नाही, पंकजांचा हल्लाबोल

(BJP Leader Pankaja Munde Holi Dhuliwandan Wishes)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.