Pankaja Munde : विरोधीपक्षातील नेते फोडण्यात पंकजा मुंडेंचा मोठा हात!, कबुली देत म्हणाल्या…
झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांची मुलाखत झाली. त्यात त्यांना विविध राजकीय, अराजकीय प्रश्न विचारण्यात आले. पंकजा मुंडेंनीही दिलखुलासपणे उत्तरं दिली.
मुंबई : “होय मी विरोधीपक्षातील नेत्यांना फोडलंय. माझे बाबा गोपीनाथ मुंडेसाहेब (Gopinath Munde) यांनी मला सांगितलंय की कायम बेरजेचं राजकारण करायचं वजाबाकीचं नाही. त्यामुळे इतर पक्षात चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय. बीड जिल्ह्यात झालेलं पक्षांतर त्याचंच द्योतक आहे. नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीत येणं हे त्याचंच उदाहरण आहे. शिवाय सुरेश धसही भाजपत आले. त्यामुळे पक्षाच्या वाढीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी इतर पक्षातील चांगल्या नेत्यांना पक्षात आमंत्रित करते”, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पक्षफोडीची कबुली दिली आहे. झी मराठीवरील बस बाई बस (Bus Bai Bus) या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचा निवेदक सुबोध भावे (Subodh Bhave) याने तुम्ही कधी इतर पक्षातील नेत्यांना फोडलं आहे का?, असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिलंय.
सध्या भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांची आवक चांगलीच वाढली आहे. त्यामुळे इतर पक्षातील नेते भाजपमध्ये जाण्यास कायम उत्सुक का असतात? आणि या नेत्यांना गळाला कोण लावतं? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडलेले असतात. त्याचं उत्तर पंकजा मुंडे यांनी या मुलाखतीत दिलं आहे.
View this post on Instagram
गोपीनाथ मुंडेसाहेब गृहमंत्री होते, तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हा मला भरपूर सिक्युरिटी असायची. त्यामुळे शक्यतो माझ्याशी बोलायली लोक घाबरायचे. पण एकदा मैत्री झाली की झाली! मग ती कायम टिकली, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तुम्हाला कुणी प्रपोज केलंय का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नाही मला कुणी प्रपोज नाही केलं. तो सुखद अनुभव मला मिळाला नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे जयहिंद कॉलेजला शिकल्या. तिथे त्यांना कधी कुणी प्रपोज केलंय का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं.
View this post on Instagram
झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांची मुलाखत झाली. त्यात त्यांना विविध राजकीय, अराजकीय प्रश्न विचारण्यात आले. पंकजा मुंडेंनीही दिलखुलासपणे उत्तरं दिली.