Pankja Munde : गुरुजींनी मला घडविण्यासाठी छडी देखील मारली, शिक्षकदिनी पंकजा मुडेंनी सांगितल्या शाळेतल्या आठवणी
अमित शहा यांना राजकारणातलं अधिक कळतं, त्यांना मोठा कॉमन सेन्स आहे. त्यांच्याबद्दल मी बोलावं इतकी मी मोठी नाही असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
बीड : राज्यात आज गणोशोत्सवासोबत जागतिक शिक्षक दिन (Teachers’ Day) साजरा केला जात आहे. आज भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankja Munde) यांनी सुद्धा त्यांच्या शाळेतील शिक्षक नानासाहेब कवडे यांच्यासोबतच्या काही आठवणी सांगितल्या. “शिक्षकामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ प्राप्प झाला आहे, शाळेतील शिक्षकांमुळे (School Teacher) मला वक्तृत्व करायचं यांची पुरेपूर माहिती दिली आहे. मी अ वर्गात होते. विशेष म्हणजे माझ्यामुळे अ वर्गात गर्दी वाढली होती. त्यामुळे वर्गाची तुकडी ढ करण्यात आली” अशी आठवण त्यांनी आज सांगितली.
उंची अधिक असल्यामुळे सर्वात शेवटी बसायचे
गुरुजींना मला घडविण्यासाठी छडी देखील मारली आहे. मी उंच असल्यामुळे सर्वात शेवटी शाळेत बसायचे. माझे राजकीय गुरू गोपीनाथ मुंडे आहेत. अमित शहा यांच्या मिशन 150 च्या वक्तव्याशी मी सहमत आहे. आम्ही सर्व टीम मिळून तो आकडा पार करणार आहोत असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
अमित शहांना राजकारणातलं अधिक कळतं
अमित शहा यांना राजकारणातलं अधिक कळतं, त्यांना मोठा कॉमन सेन्स आहे. त्यांच्याबद्दल मी बोलावं इतकी मी मोठी नाही असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
आमच्या मेळाव्याला गरिब लोकं येतात
आमच्या दसरा मेळाव्याला गरीब माणस येत असतात. आमचा वंचितांचा मेळावा असतो, मला जे स्थान आहे ते लोकांच्या अपेक्षा मधलं आहे. त्यामुळे हे महत्वाचे जास्त स्थान आहे. मला लोकांचं प्रेम भरभरून मिळतं आहे, मी त्यात जास्त समाधानी आहे. चांगल्या बातम्या आल्या तर डोक्यामध्ये यश पचविते. वाईट झालं तर हातश होत नाही. ही गोपीनाथ मुंडे साहेबांची शिकवण आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.