‘प्रबोधनकारांच्या नातवाकडून ही अपेक्षा नव्हती’
सिंधुदुर्ग: नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केलात, पण जैतापूर प्रकल्प का नाही रद्द केलात? तो का नाही समुद्रात बुडवलात?, असा प्रश्न भाजपचे कोकणातील नेते प्रमोद जठार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला. प्रबोधनकार ठाकरेंच्या नातवाकडून,उद्धव ठाकरेंकडून मला ही अपेक्षा नव्हती, असा हल्लाबोल जठार यांनी केला. कोकणातील भाजपचे बडे नेते प्रमोद जठार राजीनामा देणार आहेत. प्रमोद जठार यांनी पत्रकार […]
सिंधुदुर्ग: नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केलात, पण जैतापूर प्रकल्प का नाही रद्द केलात? तो का नाही समुद्रात बुडवलात?, असा प्रश्न भाजपचे कोकणातील नेते प्रमोद जठार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला. प्रबोधनकार ठाकरेंच्या नातवाकडून,उद्धव ठाकरेंकडून मला ही अपेक्षा नव्हती, असा हल्लाबोल जठार यांनी केला.
कोकणातील भाजपचे बडे नेते प्रमोद जठार राजीनामा देणार आहेत. प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची माहिती दिली. नाणार प्रकल्प रद्द केल्याने आपण मुख्यमंत्र्यांकडे उद्या राजीनामा सादर करणार आहोत, असं जठार म्हणाले. शिवसेनेच्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकणातील नाणार प्रकल्प दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला. आशिया खंडातील सर्वांत मोठी रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार होता. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणार इथे उभारण्यात येणार होता मात्र तो आता रद्द करण्यात आल्याने प्रमोद जठार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
कारवाई झाली तरी बेहत्तर, प्रमोद जठारच आमचे उमेदवार: भाजप कार्यकर्ते
“कोकणाला रोजगाराची गरज आहे. नाणार प्रकल्पातून दीड लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार होता. राजकीय भांडवलापोटी ज्यांनी हा प्रकल्प रद्द करायला लावला, त्यांचा निषेध करावासा वाटतो”, असं प्रमोद जठार म्हणाले.
मी उद्या मुख्यमंत्र्यांकडे माझा राजीनामा सुपूर्द करणार आहे. हा प्रकल्प गेल्याचं मला दुःख आहे,खंत आहे. याची जबाबदारी मी स्वीकारतो. विरोधकाचं श्रेय घेण्याचं पेढे वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून मी उद्या मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर करेन, असं जठार यांनी नमूद केलं.
“कोकणातल्या राजकीय पोरांचा रोजगाराचा विषय मी राजकीय तडजोड होऊ देणार नाही. मुख्यमंत्री कोणाचा यावर तडजोड करा,रोजगारावर कसली तडजोड?” असा सवाल यावेळी जठार यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे तुम्ही जैतापूर प्रकल्प का नाही रद्द केलात? तो का नाही समुद्रात बुडवलात, असाही प्रश्न जठार यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला.
कोकणातल्या जनतेची मते हवी असतील, तर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पानिपतला जाऊन पाहून यावं, असा टोला त्यांनी लगावला.
कोण आहेत प्रमोद जठार?
प्रमोद जठार हे भाजपचे माजी आमदार आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गातील महत्त्वाचे नेते आहेत. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेल्या प्रमोद जठार यांनी भाजपमध्ये सक्रीय सहभाग घेत, पुढे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न केला. कोकणपट्ट्यात भाजपची जी काही पक्षीय वाढ झाली, त्यात प्रमोद जठार यांचा वाटा मोठा मानला जातो.
प्रमोद जठार यांनी 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी विजय मिळवला. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांनी 2014 मध्ये प्रमोद जठार यांचा पराभव केला होता.
संबंधित बातम्या
नाणार प्रकल्प अखेर रद्द, मुख्यमंत्र्यांची फाईलवर अखेरची सही
स्पेशल रिपोर्ट: 1 युती आणि 100 सवाल!
राणेंचा पवारांना प्रस्ताव, रायगडमध्ये तटकरेंना मदत करतो, त्याबदल्यात…..