जनतेच्या कामांना नाकारले; जनतेने तुम्हाला नाकारले एवढं सोप्प गणित आहे, प्रसाद लाड यांचा शिवसेनेला टोला
'उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपाने शिवसेना फोडली असं वरून सरदेसाई म्हणतात. हे म्हणजे असं झालं गिरे तो भी टांग उपर' अशी बोचरी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.
मुंबई : शिवसेना (Shiv Sena) नेते वरून सरदेसाई (Varunu Sardesai) यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यामध्ये भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महत्त्वाची जबाबदारी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर असेल असंही त्यांनी म्हटलं. कोणी कितीही प्रयत्न करा मुंबईकर ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहातील असं सरदेसाई म्हणाले होते. सरदेसाई यांच्या टीकेला आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करत वरून सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपाने शिवसेना फोडली असं वरून सरदेसाई म्हणतात. हे म्हणजे असं झालं गिरे तो भी टांग उपर’ अशी बोचरी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.
वरून सरदेसाईंवर निशाणा
प्रसाद लाड यांनी वरून सरदेसाई आणि शिवसेनेला ट्विटच्या माध्यमातून टोला लगावला आहे. ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली!’- वरुण सरदेसाई, हे म्हणजे अस झाल -“गिरे तो भी टांग उपर” तुम्ही जनतेच्या कामांना नाकारले, जनतेने तुम्हाला नाकारले! एवढं सोप्प गणित असताना, स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे प्रकार आता तरी सोडा!’ असं ट्विट प्रसाद लाड यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हटलं होत सरदेसाई यांनी?
वरून सरदेसाई यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यात शिंदे गट आणि भाजपावर जोरदा टीके केली होती. तसेच त्यांनी मनसे आणि शिंदे गटाच्या संभाव्य युतीवर देखील भाष्य केलं होतं. शिवसेनेने गेल्या तीस वर्षांमध्ये अनेक वादळे पेलली आहेत. त्यामुळे तीन काय तीस पक्ष जरी एकत्र आले तर काहीही फरक पडणार नाही असं सरदेसाई यांनी म्हटलं होतं. आता लाड यांनी सरदेसाई यांच्या या टीकेचा चांगलाच समाचार घेतलाय.