Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदार प्रसाद लाड शिवसेना नेत्यांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळत आहे (BJP leader Prasad Lad meet Shivsena leaders).

भाजप आमदार प्रसाद लाड शिवसेना नेत्यांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण
Follow us
| Updated on: May 08, 2020 | 10:39 PM

मुंबई : महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळत आहे (BJP leader Prasad Lad meet Shivsena leaders). आज (8 मे) भाजप आमदार प्रसाद लाड यांनी थेट शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार अनिल देसाई यांची भेट घेतली आहे. ही भेट अनिल परब यांचे नरीमन पॉईंट येथील शासकीय निवासस्थान C-5 या ठिकाणी झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर स्वतः प्रसाद लाड यांनी या भेटीवर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रसाद लाड म्हणाले, “कोरोना प्रादुर्भावाच्या काळात परिवहन मंडळ विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांकडून शुल्क आकारत आहे. त्यामुळे कोकणाचा पालक आमदार म्हणून निवेदन सादर करण्यासाठी ही भेट घेतली.” मात्र दुसरीकडे अनिल परब यांनी या भेटीविषयी बोलताना वेगळंच कारण सांगितलं. प्रसाद लाड त्यांच्या ब्रिक्स या स्वतःच्या कंपनीच्या कायदेशीर कामाच्या निमित्ताने भेटल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. प्रसाद लाड आणि अनिल परब या दोघांनी भेटीची वेगवेगळी कारणं सांगितल्याने राजकीय चर्चेला आणखी उधाण आलं आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्यात भाजपने निवडणुकीत 4 उमेदवार उभे केले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसही 6 व्या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे एका जागेसाठी पेच तयार झाला आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रसाद लाड शिवसेना नेत्यांना भेटल्यानं त्यांच्यात काय खलबते झाली याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार कोण?

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने शर्यतीत असलेल्या उत्सुक नेत्यांना धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले होते. तर गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढली होती. बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. या दोघांना भाजपने विधानपरिषदेला संधी देण्याचं ठरवलं आहे. याशिवाय नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि भाजपच्या मेडिकल सेलचे अध्यक्ष असलेले नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपचे उत्सुक चेहरे कोण होते?

पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याचं खुद्द एकनाथ खडसेंनी सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विधानपरिषदेवर मला घ्यावं, अशी माझी इच्छा आहे. याबाबत मी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असं खडसे म्हणाले होते.

कोणत्या जागांसाठी निवडणूक

24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त होत आहेत, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 27 मे पूर्वी उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.

प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मते हवी आहेत. आघाडीकडे 173, तर भाजपकडे 115 आमदारांची बेगमी आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार 5 जागी जिंकणार, हे निश्चित आहे. भाजपला तीन जागा सहज जिंकणे शक्य आहे. अपक्षांच्या साथीने चौथी जागाही भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

MLC Polls | मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळेंच्या नावावर फुली, भाजपचे चार उमेदवार जाहीर

खडसे, बावनकुळे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील : चंद्रकांत पाटील

संबंधित व्हिडीओ :

BJP leader Prasad Lad meet Shivsena leaders

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.