संजय राऊतांचा जीव केवढा, ते बोलतात किती; दरेकरांचा राऊतांना टोला, राज ठाकरेंचे केले कौतुक
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना बाळासाहेबांच्या कामाचा विसर पडल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.
मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर (Sanjay Rau) निशाणा साधला आहे. संजय राऊतांचा दर्जा किती घसरला आहे हे ते स्व:ताच वारंवार दाखवत असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे. पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, संजय राऊत हे बाळासाहेबांचे काम विसरले आहेत. अल्टीमेटम (Ultimatum) हा बाळासाहेबांकडून दिला जात होता. मात्र आता संजय राऊत नुसतेच बोलतात. सजंय राऊत कोण आहेत, त्यांचा जीव किती ते बोलतात किती असा टोला देखील यावेळी दरेकरांनी संजय राऊतांना लगावला आहे. याचबरोबर प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत देखील केले आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेचे मी स्वागत करतो, ते सर्व गोष्टी शांततेत करत असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत
यावेळी बोलताना दरेकर यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. राज ठाकरे सर्व गोष्टी शांततेत करत आहेत. राज ठाकरे यांनी आज एक पाऊल मागे घेतले आहे. याचा आर्थ त्यांनी माघार घेतली असा होत नाही. त्यांनी चार पाऊले पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे घेतल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. आज सामनामधून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या टीकेला देखील दरेकरांनी अप्रत्यक्ष प्रतित्युत्तर दिले आहे.
यांचा अपमान म्हणजे राज्याचा अपमान कसा?
पवारांचे योगदान नाकारता येणार नाही, मात्र राज्याचा सात बारा काय एकट्या शरद पवारांच्याच नावावर आहे का? बाकी कोणीच नाहीये का?, मग शरद पवार यांचा अपमान म्हणजे संपूर्ण राज्याचा अपमान कसा होऊ शकतो असा सवाल देखील दरेकरांनी उपस्थित केला आहे. आधी महाविकास आघाडीमधील नेत्यांनी या भ्रमातून बाहेर पडावे असे दरेकरांनी म्हटले आहे. दरम्यान रवी राणा यांना घरासंबंधात पाठवण्यात आलेली नोटीस ही सूड भावनेतून पाठवण्यात आल्याचे देेखील यावेळी दरेकरांनी म्हटले आहे.