खरचटायचं सोडाच, भाजपनं ठरवलं तर रक्तबंबाळ व्हाल; प्रवीण दरेकरांचा राऊतांना इशारा

भाजपनं ठरवलं तर खरचटायचं सोडा, रक्तबंबाळ व्हाल, असा इशारा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिला. (Pravin Darekar on Sanjay Raut)

खरचटायचं सोडाच, भाजपनं ठरवलं तर रक्तबंबाळ व्हाल; प्रवीण दरेकरांचा राऊतांना इशारा
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 2:39 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही. आम्ही ऑपरेशन लोटसबाबत काहीच बोललो नाही. पण भाजपनं ठरवलं तर खरचटायचं सोडा, रक्तबंबाळ व्हाल, असा इशारा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिला. (Pravin Darekar on Sanjay Raut)

“किरीट सोमय्या हे माजी खासदार आहेत. त्यांच्या बोलण्याला त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांनी खोटेनाटे आरोप करणं थांबवावं, असं सांगतानाच जुनी थडगी आम्हालाही उकरता येतात. पण मागचं विसरुन पुढे जावं ही आमची भूमिका असते. आम्हीही जुनी थडगी उकरली तर तुमच्या पापाचे सांगाडेच सापडतील,” असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला होता. यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली.

“महाविकासआघाडीचं सरकार आम्ही एक वर्ष चालवलं आहे, असे मघाशी संजय राऊत म्हणाले. राऊतांना माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही. पण गेल्या वर्षात तुम्ही काय केलं?” असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला आहे.

“आजही तुम्ही कोव्हिड कंट्रोल करु शकत नाही. सगळं राज्य विस्कळीत आहे. ते स्वत:च भीतीने ग्रासले आहेत. त्यामुळे सारखं सावलीसारखं भिऊन सरकार पाडून दाखवा, असं आव्हान कोणीही देत नाहीत. तरीही ते बोलतात,” असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

“ऑपरेशन लोटस बाबत आम्ही काहीच बोललो नाहीत. भाजपनं ठरवलं तर तुम्ही रक्तबंबाळ व्हाल, खरचटायचं सोडाच. बोलायला फक्त संजय राऊतांनाच येत नाही. उद्या सगळ्यांनी तोंड उघडलं तर थडगी काय आणि दुसरं काय हे सगळं समजेल. त्यामुळे कोणी कोणाला आव्हान देऊ नये आणि आव्हानाच्या भाषा करुच नयेत,” असा टोलाही प्रवीण दरकेरांना लगावला. (Pravin Darekar on Sanjay Raut)

संबंधित बातम्या : 

जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे दिसतील; राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा

अर्थव्यवस्थेला ‘बूस्टर डोस देण्यासाठी ‘प्रोत्साहन पॅकेज’ जाहीर, किती ‘प्रोत्साहन’ मिळते ते भविष्यात दिसेलच, शिवसेनेचा टोला

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.