उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेच्या महिला आघाडीच्या रणरागिणींचे अवमूल्यन; दरेकरांची शिवसेनेवर टीका

केवळ सत्तेच्या समीकरणाभोवती शिवसेनेचे राजकारण फिरताना दिसत आहे, असा घणाघातही त्यांनी केला

उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेच्या महिला आघाडीच्या रणरागिणींचे अवमूल्यन; दरेकरांची शिवसेनेवर टीका
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 3:23 PM

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या (Urmila Matondkar) प्रवेशाने शिवसेनेच्या महिला आघाडीच्या (Pravin Darekar Criticize Shivsena) रणरागिणींचे अवमूल्यन झाले आहे, अशी टीका राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच, केवळ सत्तेच्या समीकरणाभोवती शिवसेनेचे राजकारण फिरताना दिसत आहे, असा घणाघातही त्यांनी केला (Pravin Darekar Criticize Shivsena).

उर्मिला मातोंडकरचा शिवसेनेत प्रवेश

राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi), महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले.

प्रवीण दरेकरांची टीका

“पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु, प्रवेश देत असताना उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशाने महिला आघाडी मजबूत होईल, अशा प्रकारच वक्तव्य करणं म्हणजे आदरणीय बाळासाहेबांनी रणरागिणी म्हणून शिवसेनेच्या महिलां कार्यकर्त्यांना जी उपमा दिली आणि ज्या रस्त्यावर आंदोलनात आघाडीवर असायच्या, तसेच ज्यांनी घर दाराची पर्वा न करता शिवसेनेच्या वाढीसाठी लढवैय्या कार्यकर्ता म्हणून काम केले, त्यांच्या कामावर पाणी फेरण्याचा प्रकार आहे”, असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं (Pravin Darekar Criticize Shivsena).

“शिवसेनेच बदलते स्वरुप दिसत आहे. त्यांनी प्रियांका चतुर्वेदी यांना खासदार केले आणि आज ज्या राज्यातील सत्तेत काँग्रेस आहे, त्या काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवेलेल्या उमेदवाराला आज पक्षात प्रवेश दिला जातो आहे”, असा खोचक टोमणाही त्यांनी हाणला.

“पक्षाची मूळ विचारधारा, आज यापलीकडे जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन केवळ सत्तेच्या समीकरणाभोवती शिवसेनेचे राजकारण फिरताना दिसत आहे”, असं म्हणत दरेकरांवर शिवसेनेवर टीका केली.

तसेच, “ज्या शिवसेनेच्या महिला आघाडीने शिवसेनेचे जीवापाड काम करतात. उदाहरणार्थ मीना कांबळी, उमेशा पवार, सुधाताई चुरी यांनी शिवसेनेसाठी रस्त्यावर काम केले. त्यांचा शिवसेनाप्रमुखांनी सन्मान केला होता. परंतु, आता उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांचे शिवसेनेने एका अर्थाने अवमूल्यन केले आहे”, असा घणाघात यावेळी दरेकरांनी शिवसेनेवर केला.

Pravin Darekar Criticize Shivsena

संबंधित बातम्या :

राज्यपाल नियुक्त आमदार : सर्वात मोठा ट्विस्ट, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा

उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला रामराम, कारण…

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.