प्रवीण दरेकर राजभवनावर, राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा भेट
प्रवीण दरेकर आणि राज्यपाल यांच्यात यावेळी राजकीय चर्चाही झाली. (Pravin Darekar Meet Governor Bhagat singh Koshyari)
मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकर आज (15 नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रवीण दरेकर राजभवनावर गेले होते. प्रवीण दरेकर आणि राज्यपाल यांच्यात यावेळी राजकीय चर्चाही झाली. (Pravin Darekar Meet Governor Bhagat singh Koshyari)
“मी दिवाळीच्या पाडव्याचा निमित्ताने राज्यपालांची भेट घेतली. ही भेट कोणत्याही राजकीय स्वरुपाची नव्हती. माझ्या मुलाला राज्यपालांना भेटण्याची फार इच्छा होती. म्हणून ही भेट होती,” असे प्रवीण दरेकर यांनी या भेटीनंतर सांगितले.
आज दिवाळीनिमित्त महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल @BSKoshyari जी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माझा मुलगा यश देखील उपस्थित होता. @yash__darekar #Diwali pic.twitter.com/5yoF6Wnqon
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) November 15, 2020
राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. 21 तारखेपर्यंत नावावर निर्णय घेण्याची शिफारस ठाकरे सरकारकडून करण्यात आली असून, अद्यापही राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच येत्या सोमवारी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. या मुद्द्यांवरुन प्रवीण दरेकर आणि राज्यपाल यांच्यात चर्चा झाली.
दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आदरणीय @BSKoshyari जी यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. @maha_governor pic.twitter.com/fQdMwfDkyX
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) November 15, 2020
“मंदिर खुली करण्याची मागणी ही सातत्याने होत होती. त्याला भाजपने समर्थन दिले. मंदिर खुली करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं. त्यानंतर सर्व बाजूने त्यांच्यावर दबाव निर्माण झाला. राज्यातील मंदिर खुली करण्यासाठी भाजप आणि सांप्रदायिक संघटनेकडून सरकारवर दबाव निर्माण केला. या सर्वांनी मंदिर सुरु करावी लागतील असे सांगितले. त्याचा स्वाभाविक दबाव झाला,” असे मत प्रवीण दरेकर म्हणाले.(Pravin Darekar Meet Governor Bhagat singh Koshyari)
संबंधित बातम्या :
हिंदुत्त्वाचा विजय झाला, ‘श्रीं’नी सरकारचा अहंकार घालवला : तुषार भोसले
राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा वाढला, ठाकरे सरकारकडून 15 दिवसांच्या मुदतीची शिफारस